वणी येथे 13 चंद्रपूर लोकसभा निवडणूक अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले
उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी दिले प्रशिक्षण
सुरेंद्र इखारे वणी:-
आगामी काळात होऊ घातलेल्या 13- चंद्रपूर- वणी आर्णी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दि. 23 मार्चला वणी विधानसभेतील केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण वर्ग दोन टप्प्यात पार पडले. हे प्रशिक्षण वणी येथील उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांचेच मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षात देण्यात आले .तसेच ईव्हीएम मशीनचे प्रशिक्षण तहसीलदार महेश रामगुंडे व तहसील विभागावातील तलाठी मंडळ अधिकारी व कर्मचारी यांनी दिले . या प्रशिक्षणाची व्यवस्था वणीचे तहसीलदार निखिल धुळधर यांनी केली.
दि. 19 एप्रिलला होऊ घातलेल्या 13 चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून या निवडणुकीची प्रक्रिया प्रत्यक्ष राबविणाऱ्या मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी वणी येथील एस. बी. लाँन मध्ये प्रशिक्षण देण्यात आले. तसेच ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण लोकमान्य टिळक महाविद्यालयात देण्यात आले.
या प्रशिक्षणात वणी मारेगाव व झरी विधानसभेतील 1700 कर्मचारी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून प्रशिक्षणात उपस्थित होते. या केंद्राध्यक्षांचे व मतदान अधिकाऱ्यांचे निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे निवडणूक घेण्यासाठी मतदान केंद्र दिल्या जाणार आहे. अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी दिली आहे. या प्रशिक्षणात मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड, नायब तहसिलदार रवींद्र कापसीकर, नायब तहसीलदार विवेक पांडे, नायब तहसीलदार अशोक ब्राम्हणवाडे, रामचंद्र खिरेकर, नरेंद्र थोटे, गिरीश बोर्डे हे अधिकारी उपस्थित होते.