23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

लो .टी . म .चे उपप्राचार्य  सुनील पावडे आणि पर्यवेक्षक अनिल टोंगे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.

लो .टी . म .चे उपप्राचार्य  सुनील पावडे आणि पर्यवेक्षक अनिल टोंगे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.

सुरेंद्र इखारे वणी :-   येथील शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा  संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालय विभागात उपप्राचार्य पदावर कार्यरत सुनील पावडे तथा पर्यवेक्षक अनिल टोंगे यांच्या शासकीय नियतवयोमानानुसार  होणाऱ्या सेवानिवृत्ती निमित्त महाविद्यालयात त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के, सदस्य उमापती कुचनकार, सुरेश शुक्ल,अनिल जयस्वाल तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांच्यासह सत्कारमूर्ती उपस्थित होते.
प्रास्ताविकात नवनियुक्त उपप्राचार्य पुरुषोत्तम गोहोकार यांनी कोरोना काळात या दोघांनी महाविद्यालयाच्या संचालनात निभावलेल्या जबाबदारीला अधोरेखित केले.
अध्यक्ष विजय मुकेवार यांच्या हस्ते सुनील पावडे यांचा तर सचिव सुभाष देशमुख यांच्या हस्ते अनिल टोंगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या उभयतांच्या धर्मपत्नी सौ. मीनाक्षी पावडे आणि सौ. मनीषा टोंगे यांचा देखील सन्मान करण्यात आला.
लोकमान्य पगारदार सेवकांची पतसंस्था आणि कर्मचारी कल्याण निधी या महाविद्यालयातील दोन संस्थांच्या द्वारे दोन्ही सत्कारमूर्तींना धनादेश प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने डॉ. रवींद्र मत्ते, कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्याधर कोडवते आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने आनंद नगराळे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी प्रशासकीय कार्यात या दोघांचेही योगदान विविध घटनांच्या आधारे स्पष्ट केले.
दोन्ही सत्कारमूर्तींच्या मनोगतानंतर अध्यक्षीय मनोगतात विजय मुकेवार यांनी आपल्या संस्थेत शिकलेले हे दोन्ही विद्यार्थी याच संस्थेतून सेवानिवृत्ती स्वीकारत असल्याबद्दल संस्थेचा अभिमान व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद नार्लावार यांनी तर आभार सुनील गेडाम यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा पिसे सर, प्रा गेडाम सर तथा प्रा राजू कोठारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News