23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

वणी पोलीस स्टेशनच्या आवारात शांतता समितीची सभा

वणी पोलीस स्टेशनच्या आवारात शांतता समितीची सभा

सुरेन्द्र इखारे वणी :-     येथील पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले ठाणेदार अनिल बेहराणी यांनी आज दिनांक 3 एप्रिल 2024 रोज बुधवारला सायंकाळी 6.30 वाजता पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता समितीची सभा आयोजित केली. 

    या सभेला उपस्थित ठाणेदार अनिल बेहराणी, उपशाखा वाहतूक विभाग सहायक पोलीस निरीक्षक , ए एस आय शेखर वांढरे, गोपनीयतेचे अधिकारी आत्राम हे उपस्थित होते. सर्वप्रथम ठाणेदारांनी उपस्थित असणाऱ्या शांतता समितीच्या सदस्यांकडून वणी शहरातील सण उत्सवात निर्माण होणाऱ्या समस्यांची माहिती करून घेतली. या शांतता समितीला वणी शहरातील विविध सण उत्सवाच्या आयोजकांना निमंत्रित करण्यात आले होते पुढे होणाऱ्या सणामध्ये गुढी पाडवा, रमजान ईद, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती,इत्यादी उत्सवाचे निमित्ताने सभेचे आयोजन केले. या सभेत बऱ्याच सदस्यांनी वणी शहरात सर्व काही ऑलवेल असल्याचे सूतोवाच केले यामध्ये शांतता समितीच्या वतीने मंगल तेलंग, प्रा पुरुषोत्तम पाटील, रजाक पठाण, राजाभाऊ पाथरडकर, रंगरेज, सईदभाई, यांनी ठाणेदारांच्या उत्साहाचे कौतुक करून  शहरातील बेशिस्त वाहतूक, अवैध दारूविक्री,अतिक्रमण, मध्यवस्तीमधून रेतीची वाहतूक, ऑटो रिक्षावाल्यांचा मुजोरीपणा,एम एस इ बी बाबत नाराजगी व्यक्त केली, नगर पालिका प्रशासनाचा दुर्लक्षितपणा तसेच अवैध  धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्याचे आवाहन ठाणेदारांना केले.  या नवीन ठाणेदारांनी उपस्थित सदस्यांना आपल्याही सहकार्याची आवश्यकता आहे परंतु आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले. माझ्याच्याने जेवढे सहकार्य करता येईल तेवढे मी करेल तसेच गुन्हेगारांची गय केल्या जाणार नाही अशी ग्वाही दिली. माझ्यापरीने वणी शहराची शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न करेल तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी मित्र पोलीस देऊ व वणी शहरात  प्रत्यक्षात पेट्रोलिंग करून परिस्थिती जाणून घेऊन अमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू व शांतता समितीच्या सभासदांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले . यावेळी मोठ्या संख्येने सण उत्सवाचे आयोजक, सदस्य ,पदाधिकारी, व पत्रकार व महिला भगिनी उपस्थित होत्या. शांतता समितीच्या यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News