18.6 C
New York
Saturday, May 18, 2024

जैताई देवस्थानात रामकथामृताचे रसपान

जैताई देवस्थानात  रामकथामृताचे रसपान

वणीकर नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून अमृतवणीचा लाभ घेेेण्याचे आवाहन 
सुरेंद्र इखारे वणी :- 
येथील प्रसिध्द असलेले जैताई देवस्थानात उत्तमोत्तम कार्यक्रम आयोजित केले जाते यावर्षी चैत्र नवरात्रात रामकथामृताचे रसपान करण्याची संधी प्राप्त करुन दिली असल्याने वणीतील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रामकथामृताचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे  .
यावर्षी चैत्र नवरात्राची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी होत आहे त्यानिमित्ताने  दिनांक ९ ते १५ एप्रिल२०२४ पर्यंत रोज सायंकाळी ७ ते ८.३० वाजेपर्यंत विद्यावाचस्पती प्रा.स्वानंद पुंड हे
आपल्या अमृतमधुर वाणीतून नित्यनूतन रामकथा
कथन करणार आहेत.तेव्हा  जैताई मंदिराच्या प्रांगणात वणीकर नागरिकांनी व परिसरातील जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या
सुश्राव्य कथासप्ताहाचा लाभ
सहकुटुंब व इष्टमित्रासह घ्यावा  असे आवाहन माधवराव सरपटवार सर व जैताई देवस्थान च्यावतीने केले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News