19 C
New York
Saturday, May 18, 2024

श्रीराम कथामृताच्या प्रत्येक कथेतुन श्रोत्यांना  नवी दृष्टी 

श्रीराम कथामृताच्या प्रत्येक कथेतुन श्रोत्यांना  नवी दृष्टी 

वणीकर श्रोत्यांचा मोठ्या प्रमाणात वाढता प्रतिसाद

सुरेंद्र इखारे वणी :- ऐतिहासिक व सांस्कृतिक भूमी असणाऱ्या वणी नगरीचे आराध्य दैवत मा जैताई देवस्थांच्यावतीने  चैत्र नवरात्रोत्सवाच्या पर्वकाळात विद्यावाचस्पती प्रा स्वानंद गजानन पुंड यांच्या अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध कथनातून साकारत असलेल्या “श्रीराम कथामृत आजच्या काळात आपल्यासाठी” पर्वणीच ठरत असून या प्रवचनाला   वणीकरांचा रोज वाढता प्रतिसाद प्राप्त होत आहे.
रामायणाच्या कथा सगळ्यांनीच ऐकल्या, वाचल्या असल्या तरी त्या प्रत्येक कथेच्या मागे नेमके कथनीय काय आहे? त्या कथेतून आपल्याला कोणता बोध प्राप्त होतो? या दृष्टीने प्रत्येक कथेचे विवेचन होत असल्याने ही प्रवचन मालिका श्रोत्यांच्या विशेष पसंतीला पात्र ठरत आहे.
देवस्थानचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी प्रास्ताविक केल्यानंतर सचिव मनू महाराज तुगनायत, सदस्य चंद्रकांत अणे, प्रसन्न जोशी , डॉ अभिजित अणे यांच्या सूत्रसंचालनाने गेल्या चार दिवसापासून या कथेने श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला आहे.
या चार दिवसात मेदिनी मुरार, लता पांडे, मेघा अलोणे, डॉ.ऐश्वर्या अलोणे यांनी रामगीतांनी कार्यक्रमाचा आरंभ केला.
पहिल्या दिवशी महर्षी वाल्मिकी ची कथा,श्रीराम जन्मापूर्वीचे प्रसंग, रघुवंशाचा महान इतिहास, दशरथाची निपुत्रिकता, श्रावण कुमाराच्या माता पित्यांचा शाप या गोष्टींचे गूढार्थ उलगडून दाखवण्यात आले.
दुसऱ्या दिवशी राम कथेचा आधारस्तंभ असणाऱ्या वशिष्ठ वाल्मिकी समन्वयाचा विचार मांडत, अहल्या कथेचा कृषी विज्ञान विषयक अर्थ श्रोत्यांना नवीन दृष्टी देणारा ठरला.
तिसऱ्या दिवशीच्या निरूपणात भगवान परशुरामांचे भारत प्रेम आणि देवी कैकयीच्या भूमिके मागे असणारे अनेक अदृश्य पैलू डॉ. स्वानंद पुंड यांनी उलगडून दाखविले.
चौथ्या दिवशी श्रीरामांचा वनवास, पंचवटीतील निवास, सीता हरण या प्रसंगांचे वरून वर्णन करण्यात आले.
संपूर्ण देशात राममय वातावरण असताना या श्रीराम नवरात्रोत्सवात अशा स्वरूपात रामायणाला सखोल आणि विविधांगी स्वरूपात समजून घेण्याची संधी देवस्थाने उपलब्ध करून दिल्याबद्दल वणीकर जनता प्रसन्नता व्यक्त करीत आहे.
ही सप्तदिनात्मक प्रवचन मालिका सोमवार दिनांक १५ तारखेपर्यंत असून वणीकरांनी मोठ्या संख्येत या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जैताई देवस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News