19 C
New York
Saturday, May 18, 2024

सुधीरभाऊ विकासाची दृष्टी असणारा नेता – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुधीरभाऊ विकासाची दृष्टी असणारा नेता- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

सुरेंद्र इखारे वणी:-
मागील दहा वर्षात पंतप्रधान मोदीजींनी देशात विकासाचा झंझावात सुरू केला. एनडीए कडे नरेन्द्र मोदी यांच्या रुपात एक शक्तिशाली इंजिन आहे. त्याला सुधीरभाऊ सारखे डब्बे जोडल्या गेले आहेत. विरोधकाकडे सर्वच घटक पक्षाचे नेते हे इंजिन आहे. मग या देशाची गाडी कशी चालेल. देशाच्या विकासाची गाडी भरधाव वेगाने धावावे असे तुम्हाला वाटत असेल तर मोदीजी सारख्या शक्तिशाली इंजिन सोबत सुधीरभाऊ मुनगंटीवार सारखे विकासाची दृष्टी असणारे डब्बे असतील तर विकासाची गाडी भरधाव धावणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते चंद्रपूर- वणी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सक्षम उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

व्यासपीठावर प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्राताई वाघ, वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार अशोक उईके, आमदार डॉ. संदीप धुर्वे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजुभाऊ उंबरकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शिवसेनेचे विनोद मोहितकर, आरपीआई आठवले गटाचे वसुरकेत पाटील, भाजपाचे रवी बेलूरकर, अलका आत्राम, विजय चोरडिया, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, जीवन पाटील, श्रीकांत पोटदुखे, नितीन वासेकर, डॉ. मंगेश गुलवाडे, गाजनन विधाते, सतीश नाकले इत्यादी नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत येथील शासकीय मैदानावर दि. 13 एप्रिलला उपमुख्यमंत्री फडणवीस बोलतांना पुढे म्हणाले की, मागील 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर आणले. 20 कोटी लोकांना घरे उपलब्ध करून दिली. 11 कोटी लोकांना घरी स्वच्छता गृह निर्माण करून दिली. बचत गटांना 8 लाख कोटी रुपये उपलब्ध करून दिली. मुद्रा लोन योजनेअंतर्गत कोट्यवधी लोकांना स्वतः च्या पायावर उभे केले. देशाला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण केले. सुधीरभाऊंना मत म्हणजे नरेंद्रजी मोदीना मत आहे. त्यामुळे सुधीरभाऊ सारखा विकासाची दृष्टी असणारा लोकप्रतिनिधी निवडून देणे ही काळाची गरज आहे.

याप्रसंगी चित्रा वाघ बोलतांना महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यावर  टीका करीत कांग्रेसमुळे हा देश रसातळाला गेला आहे. याची प्रचिती मागील चार वर्षात आली. मागील चार वर्षात  या लोकसभा क्षेत्राचा विकास झाला का ? याचा विचार प्रत्येक मतदाराने करूनच मतदान करावे असे आवाहन केले.
मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी देशाच्या व या भागाचा विकासासाठी कोणतीही जात- पात न पाहता उमेदवाराचे कर्तृत्व पाहून सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवडून देणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. या विधानसभेचे आमदार बोदकुरवार बोलतांना ही देशाची निवडणूक आहे. प्रधानमंत्र्याचे हात बळकट करण्यासाठी सुधीरभाऊंना निवडून देण्याचे आवाहन केले.
या जाहीर सभेचे सूत्रसंचालन भाजपाचे वणी विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे यांनी केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News