18.6 C
New York
Saturday, May 18, 2024

माधव सरपटवार यांच्या विविध क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल  षष्ठ्यब्दीपूर्ती साजरी  

माधव सरपटवार यांच्या विविध क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल  षष्ठ्यब्दीपूर्ती साजरी  

सरपटवार सर हे विविध क्षेत्राला गतिशील ठेवणारे विद्यापीठ

विविध सामाजिक संस्थांनी घेतली दखल

सुरेन्द्र इखारे वणी:-
वणीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रात मागील 60 वर्षात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल येथील विविध संस्थांतर्फ त्यांच्या समाजसेवेचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा येथील जैताई मंदिराच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जेष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप अलोणे, अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार, सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया, जैताई देवस्थानचे सचिव मनू महाराज हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सागर मुने यांच्या खरा तो एकची धर्म या गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनू महाराजांनी केले. त्यानंतर अतिथींच्या हस्ते जैताई मंदिर, जैताई अन्नछत्र मंडळ, विदर्भ साहित्य संघ, नगर वाचनालय, मित्र मंडळ, संस्कृत भारती, जंगल सत्याग्रह समिती, संस्कार भारती या संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सोबत येथे उपस्थित अनेक मान्यवरांनी सरपटवार यांचा सत्कार केला.
मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा सरपटवार सरांचे विद्यार्थी माजी गटशिक्षणाधिकारी उत्तम गेडाम यांनी माधव सरपटवार यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकून सरपटवार म्हणजे शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर गजानन कासावार यांनी त्यांच्या वयाच्या 23 व्या वर्षांपासून 83 व्या वर्षापर्यंतच्या जीवन प्रवासातील महत्वाचे टप्प्याची माहिती देऊन प्राचार्य राम शेवाळकरांच्या परीस्पर्शाने घडलेले सरपटवार हे विविध क्षेत्राचे मार्गदर्शक व आधारस्तंभ असल्याचे सांगितले. प्रा. अलोणे यांनी त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकून नवीन पिढीसाठी ते मार्गदर्शक असल्याचे आपल्या ओघवत्या वाणीतून स्पष्ट केले. आमदार बोदकुरवार यांनी सरपटवार यांच्या अंगी असलेल्या नम्रता व संयम या विशेष गुणांचा उल्लेख केला. माधव सरपटवार यांची मुलगी शिल्पा बिडकर यांनी त्यांच्या वडिलांवर त्यांच्यापेक्षा त्यांच्यावर निःस्वार्थ प्रेम करणाऱ्यांचा जास्त अधिकार असल्याचे सांगितले.

सत्काराला उत्तर देतांना सरपटवार म्हणाले की, प्रत्येकांनी आपल्या जीवनात समाजनिष्ठा व राष्ट्रनिष्ठा बानावी असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषण करतांना डॉ. चोपणे यांनी सांगितले की, सरपटवार ही एक व्यक्ती नसून विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था आपल्या संघटन कौशल्याने गतिशील ठेवणारे विद्यापीठ आहे. त्यांचे मार्गदर्शनात या सर्व संस्था उत्तरोत्तर प्रगती लरतील असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघाचे स्थानिक सचिव डॉ. अभिजित अणे यांनी केले. आभार प्रदर्शन नामदेव पारखी यांनी केले. ऐश्वर्या अलोणे व डॉ. अमृता अलोणे यांच्या ए मालिक तेरे बंदे हम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुन्नाभाऊ पोद्दार, मुलचंद जोशी, नामदेव पारखी , दिवाण फेरवानी, समीर लाभसेटवार, राजाभाऊ पाथ्रडकर
यांनी विशेष परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News