19 C
New York
Saturday, May 18, 2024

स्वराज्य संस्थांच्या शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ करण्याचा शासन निर्णय त्वरित रद्द करा

स्वराज्य संस्थांच्या शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ करण्याचा शासन निर्णय त्वरित रद्द करा

शासन निर्णय ; खासगी शाळा बंद पाडून शिक्षकांवर अन्याय करणारा

सुरेंद्र इखारे वणी :-    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ करण्याबाबतचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या बाबतचे निवेदन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ वणी ,मारेगाव व झरी तालुक्याच्यावतीने डॉ नितीनकुमार हिंगोले उपविभागीय अधिकारी वणी याना देण्यात आले आहे.

      15 मार्च 2024 रोजी शासन आदेश स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनुदानित शाळांच्या वर्ग 5 ते 8 वि चे प्राथमिक विभागात जोडण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे. वणी विधानसभेतील वणी, मारेगाव व आदिवासी बहुल असलेल्या झरी तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती , शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या तसेच अतिरिक्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न शासनाने विचारात घेऊन आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती परंतु शासनाने खासगी अनुदानित ,अंशतः अनुदानित शाळांचा विचार न करता त्या शाळा संपविण्याचे काम शासन करीत आहे. तसेच हा शासन निर्णय शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. तेव्हा शासनाने ज्या ठिकाणी खासगी अनुदानित माध्यमिक, प्राथमिक शाळा  आहे त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक जिल्हापरिषद शाळांना वर्ग पाचवी व वर्ग 8 वि सुरू करण्याची परवानगी देण्यात येऊ नये अन्याय करणारा शासन निर्णय त्वरित रद्द करावा . जेणेकरून खासगी अनुदानित शाळा बंद होणार नाही व शिक्षकांवर अन्याय होणार नाही व शासनाला अतिरिक्त शिक्षकांचा भुर्दंड सोसावा लागणार नाही. तेव्हा शासनाचा   खासगी शाळेसाठी विसंगत असे शैक्षणिक सुधारित निकष विहित करणारा आदेश असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी माध्यमिक शाळा आहेत तसेच एक किलोमीटर पेक्षा कमी अंतर आहे त्यांना नियम लागू करू नये आरटीइ च्या नियमानुसार पालकांनी आपले प्रवेश निश्चित करावे तसेच प्राथमिक विभागाने विद्यार्थ्यांची टी सी चे दाखले अडवू नये अशा मागणीच्या निवेदनाच्या प्रति संबधीत  मा . शिक्षक आमदार सुधाकरजी अडबाले, शिक्षणाधिकारी माध्यमिक जी प यवतमाळ डॉ जयश्री राऊत, शिक्षणाधिकारी प्राथमिक याना देण्यात आले आहे.  यावेळी वणी तालुका वि. मा. शी. कार्यवाह डी एस महाकुलकार , जिल्हा उपाध्यक्ष एस आर बोढे, जी एम गेडाम, डी एम नरुले, बी पी देरकर, डी डी घुगुल, गजेंद्र काकडे, संतोष बेलेकार, सतीश घुले, सुरेंद्र इखारे, वाय एस किन्हेकर उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News