कलावंतांना व्यासपीठ देण्याचं उत्कृष्ट कार्य म्हणजे संस्कार भारती : विजय चोरडिया
एकल नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न…
सुरेंद्र इखारे वणी- कलावंतांना मोठं होण्यासाठी व स्वतःची कला मोठी करण्यासाठी खूप जिजाऊ लागतं व त्यासाठी त्याला जिथे संधी मिळते त्या संधीचं सोनं करणं अत्यंत महत्त्वाचा आहे संस्कार भारती समिती व सागर झेप बहुद्देशीय संस्था तळागाळातील कलावंतांना व्यासपीठ देऊन प्रत्येक कलावंतांचा मानसन्मान करण्याचं उत्तम कार्य करतात आणि ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार करून त्यांना आणि त्यांच्या कलेचा सन्मान करतात ही अतिशय आनंदाची महत्वाची बाब आहे असे मनोगत सामाजिक कार्यकर्ते सर्वांचे प्रिय विजय चोरडिया यांनी व्यक्त केले
संस्कार भारती समिती व सागर झेप बहुद्देशीय संस्था द्वारे आयोजित नटराज पूजन व गुरुपूजन सोहळा श्री विनायक मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गजानन कासावर, तबला शिक्षक जयंत कुचनकर, संगीत शिक्षक लक्ष्मण राजगडकर, नृत्य शिक्षिका प्रियंका कोटनाके या सर्व गुरूंचे त्यांच्या विद्यार्थ्यांनी गुरु पूजन केले तसेच सामाजिक कार्यात आणि गरिबांना प्रत्येकाला मदत करणारे विजय चोरडिया यांच्या मातोश्री शांतादेवी चोरडिया यांनी गुरु म्हणून उत्कृष्ट संस्कार दिले चांगली शिकवण दिली. याकरिता समितीने त्यांचे गुरुपूजन केले. श्रोतावृंदना खूप आनंद झाला आणि विजय चोरडिया यांच्या आई चे गुरुपुजन केल्याने खूप भावूक झाले व समितीचे आभार मानले. यावेळी सीमा चोरडिया माधव सरपटवार व विजय चोरडिया यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष सत्कार दगडाला आकार देवून देवपण आणणारे मूर्ती कलावंत खाती चौकातील मूर्ती कलावंत नामदेव गाताडे व नाट्य कलावंत अशोक सोनटक्के यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यानंतर भक्ती गीतावर आधारित एकल नृत्य स्पर्धा संपन्न झाली यामध्ये वेगवेगळ्या शहरातून गावातून स्पर्धाकांनी सहभाग घेतला होता यात अ गटा व ब गटातील विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह, रोख 3000, 2000, 1000 व प्रोहत्सहन बक्षीस देवून गौरविण्यात आले होते. परीक्षक शीतल लाड, आकाश बोथले, अशोक सोनटक्के यांनी केले. विजय चोरडिया यांच्या सौजन्याने कार्यक्रमातील स्पर्धक, रसिकांना भोजन व चहाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी संस्कार भारती समितीच्या अध्यक्षा रजनी पोयाम, सचिव सागर मुने, अर्पित मोहूर्ले, गौरव नायनवार, अभिनव कांबळे, अंजली वैद्य, संगीता वणकर, माही खुसपुरे, सुनंदा गुहे, शेखर वांढरे, संध्या अवताडे, सीमा सोनटक्के, मीना वानखेडे,वर्षा देठे,जया हिकरे, कल्पना सिदंमवार यांनी कार्यक्रमा करीता परिश्रम घेतले.