कायर येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
कार्यक्रमात शालेय मंत्रिमंडळ व इको क्लबची स्थापना
सुरेंद्र इखारे वणी – कायर येथील विवेकानंद विद्यालयात स्वराज्यप्रेरक लोकमान्य टिळक व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते. प्रमुख उपस्थिती संस्था सचिव तथा शारीरिक शिक्षक सतीश घुले, तसेच सहायक शिक्षक मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार कु सोनाली भोयर उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक सुरेन्द्र इखारे यांचे हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच शालेय मंत्रीमंडळाचे व इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात विचार व्यक्त केले, यामध्ये ओमप्रकाश निंदेकर, श्रुती बोरूले, समीक्षा मेश्राम, योग्यश्री उपरे, सलोनी चामाटे, वर्षा मडावी ,सलोनी लेडागे, आयशा पठाण, प्राप्ती कांबळे, साजिया शेख, गौसिया सैय्यद, प्रनाली ताजने , आदिती उरकुडे यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानवी चामटे, अक्षरा उपरे,यांनी मेले तर आभार अदिती उरकुडे यांनी मानले. याप्रसंगी इको क्लब व शालेय मंत्रीमंडळाची लोकशाही पद्धतीने हात उंचावून निवड करण्यात आली . शाळांनायक मयूर खुटेमाटे,क्रीडानायक रोहन मडावी, सांस्कृतिक उपक्रम मंत्री प्राप्ती कांबळे, पर्यावरण उपक्रम मंत्री प्रवीण ढोंगे, सदस्य रोहन झोडे, आयशा पठाण, रोहन मडावी या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे यशस्वी तेसाठी सचिन टोंगे, दिलीप कानंदस्वार, मधुकर कोडापे यांनी सहकार्य केले यानंतर कार्यक्रमाची सांगता पसायदान या गीताने झाली