*पंचायत समिती मध्ये शाळा भरविण्याचा शिवसेना (उबाठा) चा इशारा*
वणी तालुक्यातील निंबाळा ( बु) येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या 32 असून ईय्यता 1 ते 5 मीळुन एकच शिक्षक आहे. त्यामुळे पालकांमध्ये मोठे असंतोषाचे वातावरण आहे.शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मुलभूत अधिकार आहे.(Right To Education) शिक्षणापासुन विद्यार्थ्यांना वंचित ठेवणे हा मोठा गुन्हा आहे येथील पालकांनी *शिवसेना विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात* गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन येत्या 8 दिवसात शाळेला शिक्षक उपलब्ध करुन देण्यात यावा अन्यथा पंचायत समिती मध्ये शाळा भरविण्याचा इशारा देण्यात आला. त्यावेळी किरण देरकर,ममता पारखी,अजिंक्य शेंडे, सरपंच ढाकोरी- अजय कवरासे, प्रविण गोहने , हरिचंद्र डवरे ,संदीप मुसळे, अमोल मुक्के अमोल वाघाडे प्रशांत शेंडे, आकाश आसुटकार , निंबाळा येथील अनेक पालक उपस्थित होते.