Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedवणीत" मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 "अभियानाची आढावा सभा संपन्न 

वणीत” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 “अभियानाची आढावा सभा संपन्न 

वणीत” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 “अभियानाची आढावा सभा संपन्न 

सुरेन्द्र इखारे वणी :-   शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग यांचे सूचनेनुसार वणी तालुक्यातील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यम पंचायत समितीच्या मुख्यध्यपकांची दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे सभागृहात दुपारी 2.00 वाजता ” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 ”  या अभियानांतर्गत वणी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांनी आढावा सभेचे आयोजन केले होते.

       या आढावा सभेला वणी पंचायत समितीचे गटविकासाधिकारी किशोर गजलवार, गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर, विस्ताराधिकारी प्रकाश नगराळे, शिक्षणविस्ताराधिकारी हेडावू साहेब, नगर परिषद प्रशासन अधिकारी गाडे साहेब ,विनोद नासरे उपस्थित होते. 

      भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2″ हे अनोखे स्पर्धात्मक अभियानाला शाळांनी राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी व शिक्षकांमध्ये नवचैत्यन निर्माण होऊन बाह्य जगाची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -2 अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील दोन किंवा तीन शाळांची निवड करून विभागीय स्तरावर नेण्याचा मानस आहे असे गटविकासाधिकारी किशोर गजलवार यांनी वणी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी याना एका आठवड्यात निवड करण्याचे सांगितले . तसेच गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुन्दर शाळा या परिपत्रकाचे वाचन करून अभियानाचे स्वरूप सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद नासरे यांनी केले तर आढावा सभेच्या यशस्वीतेसाठी बीआरसीचे सर्व शिक्षक व शिक्षकांनी सहकार्य केले, या सभेला तालुक्यातील शाळांच्या मुख्यध्यपकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments