मारेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव संपन्न
सुरेन्द्र इखारे वणी – मारेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयात शैक्षणिक सत्र 2024 – 2025 या सत्रात तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सव आज दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी साजरा करण्यात आले.
या तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सवाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक प्राचार्य श्री प्रा. हेमंत चौधरी हे होते
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री स्नेहदीप काटकर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मारेगाव हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश आत्राम सर विषय तज्ञ पंचायत समिती मारेगाव यांनी केले . कार्यक्रमाचे
प्रास्ताविक कुमारी नीलिमा पाटील विषय तज्ञ पंचायत समिती मारेगाव यांनी केले. या नाटयोत्सवाचे
पर्यवेक्षक म्हणून प्राध्यापिका संगीता आवारी मॅडम कला आणि वाणिज्य महाविद्यालय मारेगाव तसेच प्राध्यापिका तृप्ती विश्वंभरे मॅडम कला वाणिज्य महाविद्यालय मारेगाव यांनी काम पाहिले या नाट्यसंस्कार स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक1) विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मारेगाव 2) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पहापळ
3) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्डी यांनी मिळविला या कार्यक्रमाचे आभार आशिष चव्हाण विषय तज्ञ पंचायत समिती मारेगाव यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मारेगाव येथील बीआरसीचे कर्मचारी तथा पंचायत समिती मारेगाव शिक्षण विभागाने सहकार्य केले.