Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedकायरच्या विवेकानंद विद्यालयात हँडवॉश व स्वच्छता मॉनिटर उपक्रम 

कायरच्या विवेकानंद विद्यालयात हँडवॉश व स्वच्छता मॉनिटर उपक्रम 

कायरच्या विवेकानंद विद्यालयात हँडवॉश व स्वच्छता मॉनिटर उपक्रम 

 सुरेन्द्र इखारे वणी –  कायर येथील विवेकानंद विद्यालयात दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोज गुरुवारला दुपारी 4.00 वाजता विद्यालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दुसरा टप्पा या अभियानांतर्गत स्वच्छता विषयक उपक्रमातील हँडवॉश व स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबविण्यात आला.

         यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेन्द्र इखारे हे होते. प्रमुख उपस्थिती शारीरिक शिक्षक सतीश घुले, सहायक शिक्षक मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार, सोनाली भोयर उपस्थित होते. या उपक्रमाचे नोडल अधिकारी विज्ञान शिक्षक मधुकर घोडमारे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी माहिती देऊन हँडवॉश या उपक्रमाचे प्रात्यक्षिक करून दाखविले व निरोगी जीवनासाठी हँडवॉश करणे गरजेचे आहे असे विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांमधून स्वच्छता मोनिटरची निवड करण्यात आली व त्यांच्या कडून प्रत्यक्षात स्वच्छता मॉनिटरने काय केले पाहिजे याचे प्रत्यक्षित सुद्धा विद्यार्थ्याने दिले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक यांनी विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दुसरा टप्पा हे अभियान प्रभावीतपणे राबविण्यात येईल त्यासाठी  सर्वांनी एकत्रित येऊन कार्य करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले.सूत्रसंचालन सोनाली भोयर यांनी केले तर आभार रविकांत गोंडलावार यांनी मानले .व कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिपाई दिलीप कानंदस्वार, आकाश बोरूले ,मधुकर कोडापे,सचिन टोंगे ,शाळांनायक मयूर खुटेमाटे, क्रीडांनायक रोहन मडावी यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम व पसायदान या गीताने झाली

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments