शिरपूर सर्कलमध्ये शिवसेनेचा (उध्दव बाळासाहेब ठाकरे) भगवा सप्ताह साजरा
वणी विधानसभा क्षेत्रात संजयभाऊ देरकर यांचे नेतृत्वात भगवा सप्ताह
सुरेन्द्र इखारे वणी – विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा सप्ताहाचे माध्यमातून शिरपूर सर्कलमध्ये संजय देरकर यांनी कुरई,गोवारी पारडी, ढाकोरी मूर्ती बोरी या गावात जाऊन जागतिक आदिवासी दिन साजरा केला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिरपूर सर्कल मधील गावा गावांमध्ये जाऊन जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व आदिवासी बांधव तसेच नागरिकांना पटवून दिले . भगवान क्रांतीसुर्य बिरसा मुंडा, बाबुराव शेडमाके, श्याम दादा कोलाम, राणी दुर्गावती, यांच्या कार्याला उजाळा दिला या कार्यक्रमाकरिता गावा गावामध्ये अनेक आदिवासी बांधव महिला युवक युवती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिरसा ब्रिगेड संघटने कडून प्रत्येक गावात संजय देरकर यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संतोष माहुरे- विधानसभा सहसंपर्कप्रमुख, दीपक कोकास-माजी उपजिल्हाप्रमुख, रवी बोडेकर- तालुकाप्रमुख, सौ डीमनताई टोंगे- जिल्हा उपसंघटीका, सौ पुष्पाताई भोगेकर, सौ चंदाताई मून, अजिंक्य शेंडे- युवासेना उपजिल्हाप्रमुख, संजय देठे, मंगेश मत्ते, प्रशांत बल्की, भगवान मोहिते, डॉ. जगण जुनगरी, लोकेश्वर बोबडे, विठ्ठल बोंडे-सरपंच शिंदोला, अजय कौरासे-सरपंच ढाकोरी, योगीराज आत्राम-सरपंच बोरी,विठ्ठल ठाकरे, राजू झाडे, कवडू उईके, विनोद कुडमिते, अनिल उईके, मोरेश्वर किनाके, सुभाष उईके, आकाश आसुटकर, विकास धगडी हे उपस्थित होते सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र इददे यांनी केले. परिसरातील सर्व आदिवासी बधु- भगिनी मध्ये आनंदी व उत्साहाचे वातावरणात होते.