वणी-कोरोना आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकांस 50000 हजार रुपये सानुग्रह सहाय प्रदान करण्याची योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून ऑनलाइन पध्दतीने काही पात्र अर्जदारांच्या खात्यात सानुग्रह अनुदान NEFT/ ABPS प्रणालीद्वारे जमा करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात सुवर्ण जयंती महा राजस्व अभियाना अंतर्गत दिनांक 27 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोरोना आजाराने मृत झालेल्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी सानुग्रह मदत 50,000 करिता ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज केलेला आहे. परंतु काही अर्जदारांनी चुकीचे बँक खातेबाबत माहिती भरल्याने बँक खात्याशी आधार लिंक नसल्याने त्यांना सानुग्रह मदत शासन स्तरावरून जमा करण्यात आलेली नाही अशा अर्जदारांनी ।अहिती अद्यावत करून शासनास तातडीने सादर करणेकरिता दिनांक 7 नोव्हेंबर 2022 रोजी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते ज्या अर्जदारांनी अर्ज केला परंतु त्याचे खात्यात सानुग्रह अनुदान जमा झाले नाही त्या अर्जदारांनी अर्जाचे टोकन, आयडी, अर्जासोबत जोडलेले बँक खाते पासबुक व राष्ट्रीय मृत बँकेचे खाते पासबुक घेऊन उपस्थित राहून अर्जाबाबतची माहिती अद्यावत करण्यास सहकार्य करावे जेणेकरून संबधीत अर्जदारास सानुग्रह अनुदान मिळवून देण्याकरिता योग्य कार्यवाही करता येईल असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्राद्वारे कळविले आहे तेव्हा या योजनेचा त्वरित लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
Warning: Undefined array key "_wpupa_attachment_id" in /home/ricecity/public_html/wani24news.com/wp-content/plugins/wp-user-profile-avatar/templates/wp-author-box-social-info.php on line 90
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/ricecity/public_html/wani24news.com/wp-content/plugins/wp-user-profile-avatar/templates/wp-author-box-social-info.php on line 90