31.4 C
New York
Saturday, July 6, 2024

डिसेंबरला ग्रामपंचायतीच्या निवडणुक

* 20 डिसेंबरला मतमोजणी *निवडणूक कार्यक्रम जाहीर*

वणी – तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच घोषित केला आहे. त्यामध्ये माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका 18 डिसेंबरला होणार आहे. राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी 18 नोव्हेंबर 2022 ला तहसीलदार याना निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे वणी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्र 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 ते 3.00 वाजेपर्यंत सादर करता येणार आहे. उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र छाननीचा दिनांक 5 डिसेंबर सकाळी 11.00 पासून छाननी संपेपर्यंत राहील तसेच निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतीमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 7 डिसेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता नंतर,दिनांक 18 डिसेंबर 2022 रविवारला सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30पर्यंत मतदान होणार आहे. 20 डिसेंबरला मतमोजणी व निकाल घोषित करणार असून जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना 23 डिसेंबर रोजी विजयी उमेदवारांची अधिकृत यादी निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.त्यामुळे वणी तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News