31.4 C
New York
Saturday, July 6, 2024

11 नोव्हेंबर ला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने खासदारांना राजीनामा मागणे आंदोलन

11 नोव्हेंबर ला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने खासदारांना राजीनामा मागणे आंदोलन

खासदार बाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर मोर्चा

स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे यासाठी गेल्या 117 वर्षापासून सतत आंदोलन सुरू आहे मात्र राजकीय पक्ष विदर्भातील नागरिकांच्या या ज्वलंत मागणीला आपल्या सोयीनुसार वापरून नन्तर सोडून देतात विदर्भ महाराष्ट्रात सामील झाल्यापासून विदर्भावर मोठा अन्याय झाला आहे विदर्भाची सुपीक जमीन, पाणी,खनिज या खनिजावर आधारित मोठे प्रकल्प ,विद्युत निर्मितीचे प्रकल्प अश्या विकासासाठी सर्व अनुकूल बाबी असतानाही येथील जनता येथील जनता हालपेष्टा सहन करीत आहे मात्र विदर्भाच्या वाट्याला नागपूर करार केल्याप्रमाणे काहीच काहीच प्राप्त झाले नाही हो अत्यन्त दुर्देवी बाब आहे म्हणून विदर्भच्या सर्व जिल्ह्यात विदर्भ राज्य आंदोलन समिती द्वारे तीन टप्प्यात आंदोलन सुरू आहे 10 ही खासदारांनि त्यांची व त्यांच्या पक्षाची विदर्भ राज्य निर्मिती बाबत काय भूमिका आहे ते जाहीरपणे स्पष्ट करावे यासाठी खासदारांना पत्र व्यवहार आंदोलन सुरू आहे

 

मात्र अद्यापही चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही या दृष्टीने आंदोलनाच्या पुढील टप्प्यात चंद्रपूर येथे उद्या दिनांक 11 नोव्हेंम्बर 2022 ला रोज सकाळी 11 वाजता खासदार बाळू धानोरकर यांच्या चंद्रपूर येथील कार्यालयावर विदर्भ आंदोलन समितीचे कार्यकर्ते धडकणार आहे स्वतंत्र विदर्भ मिळऊन देण्यास आपण संसदीय आयुधांचा वापर करून विदर्भाचा मुद्दा सभागृहात न उचलल्या बद्दल आणि येथील नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा असमर्थ ठरल्याबद्दल राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येणार आहे या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप करणार आहे या आंदोलनाकरिता वणी,मारेगाव झरी येथुन असंख्य कार्यकर्ते जातील अशी माहिती विदर्भवादी कार्यकर्त्यांनी दिली आहे

वणी बातमी

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News