* सुचानापत्र प्रसिद्ध होताच ग्रामीण युवक सज्ज….
प्रशांत जुमनाके वणी: नुकतेच पोलिस भरतीचे सुचानापत्र शासनाने प्रसिद्ध केले असल्याने खेड्यातील मुलांनी मोठा दम धरला असून होणाऱ्या या पोलिस भरती मध्ये चांगल्या प्रकारे शारीरिक चाचणी पार पडली पाहिजे .या हेतूने ग्रामीण भागातील मुले ही पोलिस भरतीची तयारीत लागले असुन याचे पडसात पिल्की वाढोना गावातील तरुण युवकांमध्ये पाहायला मिळत आहे. या गावातील मुले ही सकाळच्या सुमारास पोलिस भरती करिता होणारे इव्हेण्ट योग्य रीतीने पार पडावे.आणि या भरतीत आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळावे. या हेतूने ग्रामीण भागातील मुले हि धावणे,गोळाफेक,लांबउडी, व अभ्यासाच्या तयारीत लागली आहेत. जीवनात जर काही साध्य करायचे असेल तर मर्यादित प्रयत्न करणे गरजेचे आहेत. अशी महत्त्वाकांक्षा अंगी बाळगून ही तरुण नवयुवक मुले होणाऱ्या पोलिस भरतीला सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.