23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

चोरडिया परिवाराने बालकदिनी फुलविले विद्यार्थांच्या चेहर्यावर आनंद.

चोरडिया परिवाराने बालकदिनी फुलविले विद्यार्थांच्या चेहर्यावर आनंद.

सुरेंद्र इखारे वणी येथील क्रांतिवीर बिरसा मुंडा न.प. शाळा क्र ९ येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस “बालकदिन” म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. सिमाताई विजयबाबू चोरडीया ह्या होत्या . प्रमुख अतिथी विधीतज्ञ सौ. ख्यातीताई चोरडिया , मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार हे उपस्थित होते . या प्रसंगी विधीतज्ञ सौ.ख्यातीताई चोरडिया यांनी बालदिनानिमीत्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच चित्रकला, गायन,संगीत खुर्चीचे आयोजन करून प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना रोख बक्षिस व शैक्षणिक साहित्य दिले त्याच बरोबर उपक्रमात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना रोख व प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना चोरडिया परिवाराकडून खाऊ देण्यात आले.विशेष म्हणजे दिवाळीपूर्वीसुद्धा चोरडिया परिवाराकडून सर्व विद्यार्थ्यांना नवीन ड्रेस, मिठाई व खाऊ देण्यात आले होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ.वेणूताई कोटरंगे यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी व शिक्षकवर्गाने पुढाकार घेतला.

वणी बातमी

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News