स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी
सुरेंद्र इखारे वणी :येथील शहर काँग्रेस कमिटीचे वतीने नगर परिषदेत असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्णांकीत पुतळ्याला हारार्पण करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा संपूर्ण देशात “बालकदिन ” म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी वणी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद निकुरे, सेवादल अध्यक्ष प्रमोद लोणारे, नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद निकुरे, सुरेश बनसोड, राजाभाऊ शिरभाते, बाबाराव गेडाम, दिनेश पाऊनकर, व कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते.