31.4 C
New York
Saturday, July 6, 2024

मुंगोली गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी

मुंगोली गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी *

गावकऱ्यांनी दिले एसडीओना  निवेदन* 

  विविध समस्यांबाबत आंदोलनाचा इशारा*          

सुरेंद्र इखारे वणी –   मुंगोली गावाचे पुनर्वसन करण्याच्या मागणीचे निवेदन गावकरी गणेश रोडे यांनी आज दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे याना दिले आहे.            मुंगोली गावाचे पुनर्वसन प्रस्तापित आहे. डब्ल्यू सी एल ने मुंगोली  गावाचे पुनर्वसन करण्यासाठी कुर्ली या गावाची जमीन संपादित केली आहे तसेच गावातील मालमत्तेचे वाचन सुध्दा झाले असून . पुनर्वसन गेल्या 8 ते 10 वर्षांपासून रेंगाळतच आहे. कारण डब्ल्यू सी एल ने गावकऱ्यांना विकल्प फॉर्म दिला नाही व चालढकल करीत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना  डब्ल्यू सी एल च्या प्रदूषणाचा, बारुद स्फोटाचा त्रास सहन करावा लागत असल्याने गावकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन जीवन जगावं लागत आहे. तरी प्रशासनाचे लक्ष नाही.       तेव्हा शासनाने मुंगोली गावाच्या पुनर्वसनासाठी त्वरित लक्ष घालावे. व डब्ल्यू सी एल च्या माध्यमातून गावकऱ्यांना विकल्प फॉर्म देऊ करावे व गावातील बेरोजगार तरुणांना कत्रांटी पद्धतीने काम देऊन गावाचे पुनर्वसन करून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात . अन्यथा गावकऱ्यांना नाईलाजाने आंदोलन करावे लागेल  तेव्हा डब्ल्यू सी एल  प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अश्या मागणीचे  निवेदनाच्या प्रति  संबंधित जिल्हाधिकारी अमोल येडगे, माजी खासदार हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मुख्य महाप्रबंधक डब्ल्यू सी एल ताडाळी, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर याना देण्यात आले यावेळी उपस्थित गणेश रोडे , शंकर पिंपळशेंडे, राजेंद्र शिंदे, विकास बोबाटेे हे होते..

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News