चारगाव येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती साजरी
सुरेंद्र इखारे वणी – तालुक्यातील चारगाव चौकी येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गावातील नागरिक व उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजभाई गेडाम, भाऊराव मडावी, संदीप धुर्वे, चेतन धुर्वे, संभा कोरवते, रामा कोरवते, सागर काळे, लक्ष्मण नैताम, मेघराज गेडाम, गणेश आत्राम, आकाश चिकराम, उपस्थित होते.