31.4 C
New York
Saturday, July 6, 2024

श्री गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाला पुणे विद्यापीठाची १ श्रेयांकासह मान्यता

श्री गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाला पुणे विद्यापीठाची १ श्रेयांकासह मान्यता

विद्यावाचस्पती प्रा स्वानंद गजानन पुंड यांच्या कार्याचा अभिनव गौरव.

सुरेंद्र इखारे वणी – श्री गणेश अथर्वशीर्ष हे श्री गणेशांचे अत्यंत लोकप्रिय स्तोत्र. मात्र ही केवळ धार्मिक स्तुती नसून अथर्व म्हणजे सुखी, शांत, प्रसन्न, समाधानी, आनंदी होण्याची भारतीय ज्ञानपद्धती आहे. व्यक्तिमत्त्व विकासाचा हा सर्वांगीण आलेख आहे. मनःशांतीचा राजमार्ग आहे.अशा भूमिकेतून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी साकार केलेल्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला सावित्रीबाई फुले विद्यापीठाने एक श्रेयांकासह मान्यता प्रदान केली आहे.
विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे आणि ट्रस्टचे अध्यक्ष श्री माणिकराव चव्हाण यांच्या हस्ते श्री मंदिरात या अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्राचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, संस्कृत प्राकृत विभाग प्रमुख डॉ. देवनाथ त्रिपाठी डॉ दिवाकर मोहंती ट्रस्टचे विश्वस्त श्री सुनील रासने, श्री ज्ञानेश्वर रासने, श्री महेश सूर्यवंशी हे मान्यवर उपस्थित होते.
२१ भागात विभागलेल्या या अभ्यासक्रमात सुरुवातीला नामांकन केल्यानंतर २१ व्हिडिओ, त्याच भागावर आधारित वाचन साहित्य आणि १० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा गूगल फॉर्म अशा गोष्टी अभ्यासकांना प्राप्त होणार आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन नाही. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रत्याभरण पत्रिका ( फीडबॅक फॉर्म) भरल्यावर संगणकीय स्वयंचलित पद्धतीने आपल्या ईमेलवर आपणास प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.
सर्वच गणेश भक्त आपल्या आनंदासाठी हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. तथापि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेत, कोणत्याही वर्गात प्रवेश असणाऱ्या विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमाच्या पूर्णते नंतर प्राप्त होणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारे एक श्रेयांक ( क्रेडिट) प्राप्त होणार आहे हे विशेष उल्लेखनीय.
लॉकडाऊनच्या अत्यंत विपरीत काळात या व्याख्यान मालिकेच्या माध्यमातून अनेक श्रोते त्यांच्या विमनस्क अवस्थेतून बाहेर आल्याचा इतिहास आहे. त्यावर आधारित असल्याने मनाला उभारणी देणारा आणि व्यक्तिमत्त्वाचा विविध अंगी विकास करणारा हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आता सगळ्यांच्या साठी उपलब्ध होत आहे ही खरोखरच मोठी उपलब्धी आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मुलांसाठी आणि सर्व भारतीय संस्कृत प्रेमींनी निर्गुण, निराकार परब्रह्म परमात्मा स्वरूप समजून घेण्यासाठी या अभ्यासक्रमाचा जरूर लाभ घ्यावा.
ऑनलाइन स्वरूपाचा , संपूर्णत: नि:शुल्क असणारा हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या तथा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या संकेतस्थळावर लवकरच कायमस्वरूपात उपलब्ध असेल.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News