31.4 C
New York
Saturday, July 6, 2024

संस्कार भारतीचा दिवाळी परिवार मिलन सोहळा  उत्साहात संपन्न

संस्कार भारतीचा दिवाळी परिवार मिलन सोहळा  उत्साहात संपन्न

सुरेंद्र इखारे वणी – येथील संस्कार भारती शाखेने नुकताच आयोजित केलेला दिवाळी परिवार मिलन सोहळा सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्साहात संपन्न झाला. सोहळ्याचे उद्घाटन माधव सरपटवार ,ऍड. कुणाल चोरडिया व रजनी पोयाम ह्यांनी नटराज पूजन करून केले.            त्यानंतरच्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्नेहलता  चुंबळे ,रजनी पोयाम , कविता चटकी. अर्चना बोदाडकर . स्वप्ना पावडे ,कमलाकर चुंबळे , भारती सरपटवार , रविंद्र चव्हाण ,अभय पारखी  इत्यादिंनी कलावंतांनी विविध कला सादर केल्या आणि  रसिकांच्या प्रशंसेला पात्र ठरले. अर्चना बोदाडकरने घेतलेल्या एक मिनिट स्पर्धेला वभारती सरपटवारने घेतलेल्या *आय लव्ह यू* गेमला उपस्थित जोडप्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर राज्यनाट्य स्पर्धेत अभिनयाचे पारितोषिक पटकाविले यासाठी वणीतील प्रसिद्ध नाट्यकर्मी अशोक सोनटक्के व बाल नाट्य कलावंत राधा सोनटक्के  यांचा समिती तर्फे सत्कार करण्यात आला. तसेच चंद्रपूर येथील कलावंतांनी तयार केलेल्या चित्रपटात वणीच्या शुभम उगले याने मराठी चित्रपट पल्याड मध्ये काम केले व मर्डर इन अ कोर्ट रूम या वेबसिरीज मध्ये अभिनय केला आहे. या त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला.त्या नंतर  समाजसेवक विजय चोरडिया यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित संस्कार भारतीच्या रांगोळी स्पर्धेतील  प्रथम पुरस्कार सुजाता ताटेवार, रोख 3100 व स्मृतिचिन्ह, द्वितीय पुरस्कार मनीषा पिंपळकर रोख 2100 व स्मृतिचिन्ह तृतीय पारितोषिक 1100 रोख व स्मृतिचिन्ह देण्यात आले तसेच निशा ढुमणे, वर्षा गोवरदीपे, समीक्षा पहापळे, वैशाली वातीले, प्रवीण जुमनाके, निशा गोवरदीपे यांना उत्तेजनार्थ  बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. परिवार मिलन कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांना व सांस्कृतिक कार्यक्रमात नैपुण्य दाखवुन बक्षिस प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना समारंभाध्यक्षा रजनी पोयाम  आणि प्रमुख आतिथी माधव सरपटवार,अँड्. कुणाल चोरडिया , मंजुषा पिंपळशेंडे, संगीता खाडे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन रविंद्र चव्हाण व आभार वैशाली बलकी   यांनी केले. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लक्ष्मी नारायण नागरी सहकारी मर्यादित पतसंस्था वणी व ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूल चिखलगाव यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व पदाधिकारी व सदस्यां यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.

 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News