वणीत अतिक्रमण मोहीम
आदेशाचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कारवाई * तहसीलदार निखिल धुळधर यांचे आवाहन*
सुरेंद्र इखारे वणी – येथील नगर पालिका प्रशासनाने अतिक्रमण मोहीम हातात घेतल्याने टिळक चौकातील व परिसरातील दुतर्फा असलेल्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय थाटल्याने शहरातील रस्ते अरुंद होऊन रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचे प्रमाणात वाढ झाली त्यामुळे रस्त्याची रुंदी वाढवून शहराच्या सौंदर्यीकरण करण्याचे दृष्टीने शासनाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हातात घेऊन कारवाईचा बडगा जोरात सुरू केला आहे. त्यामुळे वणी शहर व परिसरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे. तरी अतिक्रमण काढलेल्या जागी वा तहसील कार्यालयाचे परिसरात कुठेही कुणीही अतिक्रमण करू नये तसे आढळल्यास त्याच दिवशी अतिक्रमण निष्काशीत करण्यात येईल व नुकसाणीबाबतची पूर्ण जबाबदारी ही अतिक्रमण धारक यांची राहील तसेच अतिक्रमनधारक यांनी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचेवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आवाहन तहसीलदार निखिल धुळधर यांनी केले आहेत तेव्हा अतिक्रमणधारकांनी सहकार्य करावे.