कायरचा प्रशांत ने ASO, STI, PSI मधे मारली बाजी….
* ASO मध्ये प्रशांत निखाडे महाराष्ट्र राज्यातून प्रथम….
प्रशांत जुमनाके / बातमीदार वणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये वणी तालुक्यातील कायर येथील प्रशांत बिंबिसार निखाडे यांनी एकाच वेळी तीन पदाना गवसणी घातली.असून सर्वत्र त्याचे गुणांचे कौतुक करण्यात येत आहे. कायर या खेड्यातील प्रशांत बिंबिसार निखाडे हा गरिब कुटुंबातील मुलगा असुन त्याला शिक्षणाची खुप गोडी होती. प्रशांतचे वडील बिंबिसार निखाडे व आई शोभा निखाडे हे कायर येथील निवासी असुन शेतीचा व्यवसाय करतात. सदर प्रशांत हा सगळ्यात लहान मुलगा असुन त्याला शिक्षणाची खुपचं आवड होती.त्याचा जन्म १२/०४/१९९७ रोजी कायर येथे झाला . प्रशांतच्या प्राथमिक शिक्षणाची सुरूवात जिल्हा परिषद कायर येथुन झाली. आणि माध्यमिक शिक्षण विवेकानंद विद्यालय कायर येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण एस.पी.एम वणी, सदर त्यांनी महाविद्यालय शिक्षण वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालय मधून बि.एस.सी, चे शिक्षण पूर्ण केले. व परीक्षेच्या तयारी करिता पुणे येथे गेले. व त्यांनी परीक्षेची तयारी सुरू केली व अवघ्या तिन वर्षात प्रशांत ने एकाच वेळी ASO, STI, तथा PSI (collifide), तीन परीक्षेत बाजी मारली. त्यात सर्वत्र त्याचे गुणांचे कौतुक होत असुन प्रशांत हा ASO मधे महाराष्ट्र राज्यातून प्रथम तर STI मधे तृतीय रँक , आणि PSI कॉलिफाईड करुन ASO, STI, तथा PSI (collifide) परीक्षा उत्तीर्ण करून बाजी मारली असल्याने सर्वत्र प्रशांतच्या गुणांचे कौतुक होत आहेत. तरी याचे सर्व श्रेय त्यांनी सर्व शिक्षक व कुटुंबातील परीवारांना दिले आहे……