31.4 C
New York
Saturday, July 6, 2024

चंद्रपूर जिल्हा शिक्षक समन्वय समितीची कार्यकारिणी गठीत   

चंद्रपूर जिल्हा शिक्षक समन्वय समितीची कार्यकारिणी गठीत   

मा सुधीर मुनगंटीवार वन मंत्री व किशोर जोरगेवार आमदार याना दिले निवेदन

सुरेंद्र इखारे वणी – चंद्रपूर येथील जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक समन्वय समितीची आज दिनांक 20 नोव्हेंबर 2022 ला जुबली हायस्कूल चंद्रपूर येथे राज्याध्यक्ष बाबू मिया शेख सर राजाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मार्गदर्शक म्हणून कार्यकारी सचिव  किशोर निर सर राज्य महिला प्रतिनिधी पोरेड्डीवार मॅडम  यांच्या उपस्थितीत सभा पार पडली.             यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून सन 2018 पासून ते 2022 पर्यंत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक बंधू आणि भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात   किशोर निर सर यांनी सांगितले की आपल्या या लढ्याची सुरुवात कशा पद्धतीने झाली आणि व आता आपल्याला कोणते पाऊल उचलावे लागणार आहे .याठिकाणी वेतनवाढ संदर्भात शासन निर्णयाचे सखोल विवेचन करण्यात  आले. अध्यक्षस्थानावरून बाबूमियाँ शेख म्हणाले  संघटना अतिशय महत्वपूर्ण आहे त्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी संघटना टिकवून ठेवण्यासाठी   तनमनधनाने सहकार्य करावे लागेल असे प्रतिपादन केले.त्यानंतर  जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली यामध्ये  जिल्हाध्यक्ष  श्गुणवंत खोरगडे सर कोरपना तालुका सचिव  विनोद गेडाम सर चिमूर तालुका कार्याध्यक्ष श्री जितेंद्र लेनगुरे  सर मूल तालुका कोषाध्यक्ष स्वतंत्रकुमार शुक्ला सर  हायस्कुल विभाग उपाध्यक्ष   सौ स्मिता अवचट मॅडम   पोंभुरणा तालुका उपाध्यक्ष   विनोद कोवे सर सहसचिव  गुणाकार जुमनाके सर महिलाप्रतिनिधी करुणा गावंडे मॅडम तालुका प्रतिनिधी जिवती प्रवीण बुच्चे सर ,बल्लारपूर  सौ प्रीती झगझाप मॅडम गोंडपीपरी   श्री गौतम उराडे सर चंद्रपूर  सुनील ढोके सर भद्रावती सौ वनिता बलकी मॅडम वरोरा सतीश डांगरे सर सावली  हितेंद्र कोकाटे सर सिंदेवाही ब्राम्हणकर सर नागभीड  श्री नंदू मस्के सर ब्रम्हपुरी विनोद मदनकर सर

यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सभेचे सूत्रसंचालन श्री गुणवंत खोरगडे सर यांनी केले  तर आभार  सतीश डांगरे सर यांनी मानले .

 सर्व नवनियुक्त जिल्हा कार्य करणीचे  हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून यावेळी 

सर्व राज्यप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रतिनिधी सोबत जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनीनी  नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब मंत्री वने व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य यांनां

तसेच श्री किशोरभाऊ जोरगेवार आमदार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना समनव्य समिती मार्फत निवेदन देण्यात आले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News