31.4 C
New York
Saturday, July 6, 2024

रस्त्यावरच्या निराधार  वृद्धानां ब्लॅंकेटचे वाटप। 

रस्त्यावरच्या निराधार  वृद्धानां ब्लॅंकेटचे वाटप। 

नगर सेवा स्वछता समितीचा उपक्रम। 

सुरेंद्र इखारे वणी  -येथील  नगर सेवा स्वच्छता समितीचे वतीने रस्त्यावर थंडीत कुडकूडणाऱ्या निराधार वृद्धाना ब्लॅंकेटचे वाटप करून मायेची उब देण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे .

समाजात आर्थिक विषमता असल्याने अनेकांना परिस्थितीचा सामना करावा लागतो त्यामुळे जीवन जगत असताना गरिबीच्या झळा आणि पोटात भुकेच्या कळा सोसत आधार नसणाऱ्या  निराधार वृद्धांना कडक्याच्या थंडीत थरथरू नये म्हणून समाजातील काही दानशूर व सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन गर्जवतांना या थंडीच्या काळात मदत करावी असे आवाहन सुध्दा नगर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अशीच मदत नगर सेवा स्वच्छता समितीने गरिबांना ब्लॅंकेट देऊन थंडीपासून बचाव करीत आहे . विदर्भात थंडीचा पारा वाढत असल्याने तसेच वणी शहरात सामान्य  तापमानाच्या खाली आला आहे.त्यामुळे चार भिंतीच्या आत सुद्धा पांघरून ओढून  थंडी सहन करणे कठीण झाले आहे, अशा परिस्थितीत सामाजिक बांधीलकीची जाण ठेवून नगर सेवा स्वच्छता समिती तर्फे थंडीत रस्त्याच्या बाजूला बंद झालेल्या दुकानाचा आसरा घेत झोपणार्‍या साई मंदिर चौक, बस स्टॅन्ड परिसर, शालिमार पान सेंटर कॉम्प्लेक्स परिसर व दिपक टॉकीज परिसरात अनेक वृद्धाना ब्लँकेट वाटप करून मायेची ऊब दिलीआहे . थंडीपासून रस्त्यावरील निराधारांचे संरक्षण व्हावे, यासाठी नगर सेवा स्वच्छता समिती मागील अनेक वर्षांपासून दरवर्षी थंडीचे काळात रात्रीला रस्त्यावर झोपून असलेल्या गरजवंताना ब्लॅंकेटचे वाटप करण्याचा उपक्रम राबवित आहे . यावेळी समितीचे माजी सैनिक नामदेवराव शेलवडे, माजी मुख्याध्यापक दिनकरराव ढवस, राजू तुराणकर, राजेंद्र साखरकर मुख्याध्यापक, विकास जयपूरकर यांनी त्या गरजू ला ब्लँकेट दिले .

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News