31.4 C
New York
Saturday, July 6, 2024

वसंत जीनिंगच्या अध्यक्षपदाची बिनविरोध निवड  

वसंत जीनिंगच्या अध्यक्षपदाची बिनविरोध निवड

    अध्यक्षपदी आशिष कुलसंगे, उपाध्यक्षपदी जयकुमार आबड ,तर, कार्यकारिणी संचालक प्रा डॉ शंकर वरहाटे  

    सुरेंद्र इखारे वणी – विदर्भात नामांकित असलेल्या वणी विधानसभा क्षेत्रातील वणी येथील दि वसंत जिनिंग को ऑपरेटिव्ह प्रेसिंग फक्ट्रीच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडली. या निवडणुकीत  आशिष कुलसंगे यांची अध्यक्षपदासाठी तर उपध्यक्षपदि जयकुमार आबड तसेच कार्यकारिणी संचालकपदी प्रा डॉ शंकर वरहाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.         या निवडीने वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचा बालेकिल्ला पुनर्जीवित होऊन एकसंघ झाला आहे. वसंतच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या परिवर्तन पॅनेलने विरोधकांचा धुव्वा उडवून दिला  व एक हाती सत्ता स्थापन केली.  माजी आमदार वामनराव कासावार यांनी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व सिद्ध केले आहे.किसिने खूब कहा ” सत्य कुछ समय के लिय निराश हो सकता है, परास्त नहीं” हे या निवडणुकीतून सिध्द झाले आहे.  वसंत जीनिंगच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष,व कार्यकारिणी संचालक यांची निवड करण्यासाठी पक्षश्रेष्ठीनी निवडून आलेल्या सर्व संचालकांची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये सर्वानुमते ठरले त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असे सांगितले अध्यक्षपदासाठी आशिष कुलसंगे यांचे सूचक प्रमोद वासेकर अनुमोदन अशोक नागभीडकर, उपध्यक्षपदासाठी जयकुमार आबड यांचे सूचक घनश्याम पावडे, अनुमोदन प्रा शंकर वरहाटे, तर कार्यकारिणी संचालक  प्रा डॉ शंकर वरहाटे यांचे सूचक पुरुषोत्तम आवारी अनुमोदन अशोक धोबे हे होते. निवडणूक अधिकारी म्हणून सहारे साहेबांनी काम पाहिले . यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे, माजी आमदार वामनराव कासावार, डॉ मोरेश्वर पावडे,डॉ भाऊराव कावडे,संचालक संजय खाडे, विनोद गोडे, गजानन खापणे, रविंद्र धानोरकर, साधना गोहोकार, शारदा ठाकरे, राजेंद्र कोरडे ,  डॉ महेंद्र लोढा, शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, अरुणा खंडाळकर, अनंतलाल चौधरी, जयसिंग गोहोकार, बाबाराव ठाकरे, ओम ठाकूर, उपस्थित होते.        

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News