अभ्यासक्रम मंडळावर लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या प्राध्यापकांची निवड
सुरेंद्र इखारे वणी – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या प्राधिकरणांच्या विविध निवडणुकांमध्ये विविध विषयांच्या अभ्यासक्रम मंडळांवर महाविद्यालयीन प्राध्यापक वर्गातून निवडल्या जाणाऱ्या तीन प्राध्यापकांच्या संवर्गांमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे, डॉ अभिजित अणे तथा विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांची अभ्यासक्रम मंडळावर निवड झाली आहे .
लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य खानझोडे वाणिज्य विभागात, डॉ. अभिजित अणे विज्ञान विषयातील भाषा विभागात तर डॉ. स्वानंद पुंड कला शाखेतील संस्कृत अभ्यासक्रम मंडळावर निवडले गेले असल्याने तीनही विद्या शाखांमध्ये विद्यालयाचे प्रतिनिधित्व नोंदवले गेले आहे.
डॉ खानझोडे आणि डॉ अणे हे आपापल्या अभ्यासक्रम मंडळावर सलग दुसऱ्या वेळा निवडून आलेले आहेत तर डॉ स्वानंद पुंड संस्कृत अभ्यासक्रम मंडळावर सलग तिसऱ्या वेळी अविरोध निवडून आलेले आहेत हे विशेष आहे.
महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या या वैशिष्ट्यपूर्ण उपलब्धी बद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला, उपाध्यक्ष रमेश बोहरा, सचिव लक्ष्मण भेदी , सहसचिव अशोक सोनटक्के यांच्यासह सर्व संचालक गण, आजीव सभासद, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तथा वणीतील नागरिकांनी अभिनंदन केले .