वाघाच्या हल्ल्यात मजूर गंभीर जखमी…
प्रशांत जुमनाके वणी…
वणी तालुक्यातील ब्राम्हणी येथील टॉवर चे कामकाज करिता आलेल्या परप्रांतीय तरुणावर वाघाने सकाळचे दरम्यान प्राणघातक हल्ला केल्याची घटना ब्राम्हणी गावालगत असलेल्या शिवारात घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की वनविभागाकडून मिळाल्या माहिती नुसार ब्राम्हणी येथील टॉवर चे कामकाज चालू असून त्या कामावर मजूर उपजिविकेसाठी कामकाज करीत होते.. सदर बाहेरील परप्रांतीय मजूर कामासाठी आपले तंबू बांधून ब्राम्हणी शिवारात राहत होते. उमेश पासवन हे नियमित प्रमाणे सकाळच्या सुमारास शौचालया करिता मोकळ्या परिसरात गेले होते. अचानक झुडपात दडलेल्या वाघाने त्या मजुरावर हल्ला केला त्यात उमेश पासवान यांनी आरडा ओरडा केला .त्यावेळी घटनेस्थळी तेथील मजूर धाऊन आले त्यामुळे वाघ घाबरून गेलां व त्याने तेथून पड काढला. परंतु मजुराला गंभीर मोठी इजा झाली. लोकांनी ऑटो मध्ये टाकून तत्काळ वणी येथील लोढा हॉस्पिटल मध्ये भरती केले . त्यांच्या वर लोढा हॉस्पिटल दवाखान्यात उपचार चालू आहे. सदर घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले . व घटनेचा पाहणी करून पंचनामा करण्यात आलेला आहेत. सदर वणी परिसरात अश्या प्रकारच्या घटना वारंवार घडत असून यापुर्वी मनिष नगर ,नवकार नगरी या भागात अशा घटना घडल्या होत्या.याकडे वनविभागाने जातीने लक्ष देऊन वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून होत आहेत.