३५२४ किलोमीटर सायकल प्रवास…..
पद्मश्री सन्मानित डॉ. किरण सेठ’सायकल सहल’ घेऊन वणीत पोहोचले,
प्रशांत जुमनाके
वणी:- पद्मश्री सन्मानित डॉ. किरण सेठ दिल्लीचे निवृत्त आयआयटी प्राध्यापक तसेच ७५ वर्षीय तरुणच …आणि ३५२४ किलोमीटर सायकल प्रवास करणारा ध्येयवेडा किरण सेठ वणी येथे पोहोचताच मॅकरून शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी शिवाजीचा पुर्णाकित पुतळ्यासमोर भारतीय संस्कृतीनुसार शॉल, श्रीफळ वपुष्पगुच्छ देऊन तसेच टाळ्यांचे गर्जन करीत जल्लोषात स्वागत केले.ते काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास करत आहे. पर्यावरण, ध्यान, योग आणि शिक्षणाचा संदेश देत त्यांचा सायकल दौरा सुरू आहे.
वणी या पवित्र नगरीत त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यांनी उत्कृष्ट शाळेत मुलांना भारतीय संस्कृतीसोबत ध्यान, योग, शास्त्रीय संगीताचे महत्त्व पटवून दिले. ते जीवनात आत्मसात केल्याने आपले ध्येय साध्य करता येते, असे ते म्हणाले. आजचा संपूर्ण कार्यक्रमाचा रूपरेषेचा जबाबदारी देखील मॅकरून शाळेनी घेतली आहे.
मॅकरून शाळेचे मुख्याध्यापिका शोभना मॅडम, सीबीएस्ई सहाय्यक नितेश कुरेकार, संगीता पवार, अश्विनी मिश्रा,सपना तूरानकर, प्रिया भगत, शाळेचे पि.टी.आय निखिल घाटे, सिटी ब्रांचचा शाळेचे इन्चार्ज अजय कंडेवार तसेच समस्त विद्यार्थ्यांनी या जंगी स्वागत केले.
सायकलने ३५२४ किलोमीटरचा प्रवास :-
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आयआयटीचे प्राध्यापक किरण सेठ सायकलवरून ३५२४ किलोमीटरचा प्रवास करत आहेत. तो काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकलने प्रवास करत आहे.त्याने सांगितले की, तो रोज २० ते २२ किलोमीटर सायकल चालवतो. सुमारे २०० दिवसात त्याचा प्रवास पूर्ण होईल.