डब्ल्यू सी एल ने जंगल ढिगाऱ्यावरील फेसोफिस साफ करून गावकऱ्यांना सुविधा द्या
डब्ल्यूसिएल परिसरातील सरपंचांनी विजय पिदूरकर यांचे नेतृत्वात दिले निवेदन
खानपरिसरात वाघांचा धुमाकूळ उपाययोजना करण्याची गरज
सुरेंद्र इखारे वणी – वणी तालुक्यातील डब्ल्यू सिएल एरियातील गावा लागत असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरील फेसोफिस जंगलात वाघांचा धुमाकूळ असल्याने गावकऱ्यांना महत्वपूर्ण सुविधा देण्याच्या मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांचे नेतृत्वात परिसरातील सरपंचांनी क्षेत्रीय महाप्रबंधक अलोककुमार वेकोली वणी नार्थ भालर वसाहत याना दिले आहे. डब्ल्यूसिएल परिसरातील फेसोफिसच्या जंगलात अनेक दिवसांपासून वाघांचा मुक्तसंचार असून अनेक पाळीव प्राणी तसेच मानवी जीवांचे भक्षण करीत आहे. त्यामुळे डब्ल्यू सिएल लगतच्या गावकऱ्यात ,खान कामगारात ,शेतमजुरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हा डब्ल्यू सिएल ने मातीच्या ढिगाऱ्यावरील मोठ्याप्रमाणात वाढलेल्या फेसोफिस वृक्षामुळे किर्र असे जंगल झाल्याने वाघोबांचे वावर असल्याने मानवी जीवनाला मुकावे लागत आहे जसे रांगणा,भुरकी, वागदरा, ब्राम्हणी, भालर, येथील गावकऱ्यांचा बळी घेतला आहे त्यामुळे डब्ल्यूसिएल ने उकणी, निळापूर, ब्राम्हणी, पिपरी, पिंपळगाव, जुनाड, बोरगाव, कोलेरा, या ठिकानावरील जंगल एरियातील फेसोफिस साफ करण्यात यावे व वनविभागाच्या मार्गदर्शनात गावात वाघ येणार नाही याकरिता प्रतिबंधक उपाययोजना करण्यात यावी. तसेच गावातील नागरिक, कामगार, शेतकरी शेतमजूर यांचे सरंक्षण होण्याचे दृष्टीने वनविभाग, महसूल विभाग यांचेशी समन्वय ठेवून उपाययोजना करण्यात यावी अशा मागणीच्या निवेदनाचे प्रति संबंधित वनमंत्री मा सुधीर मुनगंटीवार, उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, वनपरिक्षेत्र अधिकारी वणी, याना देण्यात आले आहे . यावेळी उपस्थित विजय पिदूरकर, साधना उईके, दीपक मत्ते, अतुल बॉंडे, हे होते.