शेत ओलित करण्याकरिता दिवसा 12 तास ए जी ची लाईन सुरू ठेवण्याची मागणी
मनसेने दिले कनिष्ठ अभियंत्याला निवेदन
अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा।
सुरेंद्र इखारे वणी – कायर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती ओलितासाठी ए जी लाईन दिवस बारा तास ठेवण्याबाबत चे निवेदन मनसेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मुकुटबन याना देण्यात आले आहे. कायर परिसरात मोठ्या प्रमाणात ओलिताची शेती असल्याने या परिसरात ए जी लाईनची आवश्यकता आहे. परंतु ही लाईन वारंवार जात असल्याने रब्बी पिकास पाणी देण्याकरिता शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच शेतकऱ्यांना शेतात ओलित करण्याकरिता वेळ वाढवून देण्यात यावा यासाठी विद्युत मंडळाने ए जी ची लाईन 12 तास ठेवण्यात यावे यासाठी नियमित वेळापत्रक जाहीर करून शेतकऱ्यांना पूर्व सूचना देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांच्या समस्येचा गांभीर्याने विचार करून सात दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या ए जी लाईन बाबत समस्या सोडवाव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार व कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असा इशारा देण्यात आला आहे. संबंधित निवेदनाच्या प्रति उपविभागीय अभियंता म रा वी क वणी, अधीक्षक अभियंता यवतमाळ, मुख्य अभियंता अमरावती याना देण्यात आल्या . यावेळी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, लक्की सोमकुंवर, वैभव पुरणकर, सारंग चिंचोलकर, अरबाज खान, सारंग बोथले, राहुल पिदूरकर, अमोल बलकी, जगन ताजने, वामन मालेकार, संजय भोयर, सुनील गौरकर, रामकृष्ण खुटेमाटे, रामदास नांदे, प्रभाकर मुळे, गणेश झाडे, सुधीर मंदे, रमेश चांदेकर, आकाश खुटेमाटे उपस्थित होते.