स्व.विट्ठल पाटील मांडवकर विद्यालय तेजापूर
संविधान दिन साजरा…..
प्रशांत जुमनाके / वणी…..
२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तरी या दिवसाचे अवचित्त साधून आज दिनाक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी स्व.विठ्ठल पाटील मांडवकर विद्यालय तेजापूर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेषराव बेलेकार यांच्या हस्ते संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मारोती पिंपळकर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांकडून सामुहिकरित्या संविधानाच्या प्रास्तविकेचे वाचन करण्यात आले. श्री. मदन मडावी, प्रकाश गारघाटे व नयन नंदूरकर यांनी संविधानाच्या निर्मितीपासून ते अंमलबजावणी पर्यंतची माहिती दिली. तसेच संविधान या विषयावर प्रश्नमंजुषा व बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा हा उपक्रम घेण्यात आला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची ओळख व्हावी व त्यांनी उत्तरोत्तर अभ्यासात प्रगती करण्याच्या हेतूने मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री. नयन नंदूरकर यांनी केले.
कर्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री. गजानन मालेकार, विजय मांडवकर, संतोष मालेकार व प्रविण विधाते यांनी सहकार्य केले.