लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये संविधान दिन कार्यक्रम संपन्न
सुरेंद्र इखारे वणी –लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, समाजशास्त्र विभाग व राज्यशास्त्र विभाग तसेच तालुका विधी समिती, अधिवक्ता संघ आणि पोलिस विभाग वणी यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर 2022 ला संविधान दिनानिमित्त कायदे विषयक शिबिर आणि संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन लोकमान्य टिळक महाविद्यालयातील प्राचार्य मा. डॉ. प्रसाद खानझोडे ,प्रमुख अतिथी म्हणून मा. न्यायाधीश श्री. ॲड. सुधीर बोमिडवार तसेच मा . मायाताई चाटसे सहायक पोलिस निरीक्षक वणी,कार्यक्रमाचे मार्गदर्शक ॲड. एन.एम.चौधरी वरिष्ठ अधिवक्ता,वणी,तसेच विकास मुंधे पोलीस निरीक्षक सायबर क्राईम ,यवतमाळ अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मनोगत व्यक्त करतांना माननिय न्यायाधीश श्री.सुधीर बोमिडवार यांनी संविधान निर्मितीचा इतिहास थोडक्यात स्पष्ट करून संविधानातील उद्देश्यपत्रिकेच्या मूळ विषयाला म्हणजे स्वातंत्र्य,समता बंधुता गणराज्य या मूल्यांचे मार्मिकत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले, तसेच पोलिस निरीक्षक माया चाटसे यांनी संविधानाचे आपल्या जीवनातील महत्व या विषयावर त्यांनी मत व्यक्त केले ,त्यांनतर ॲड. श्री. एन .एम . चौधरी यांनी संविधानातील 6 मूलभूत अधिकार व त्या अधिकारातील कलम 12 ते कलम 32 अश्या एकूण 21 कलमातील वेगवेगळ्या विषयाचे महत्व प्रतिपादन विद्यार्थ्यांनपुढे केले,नंतर मा. श्री. विकास मुंधे यांनी संविधानाचे महत्व व सायबर क्राईम गून्हे आणि सोशल मीडिया चे फायदे आणि तोटे अगदी समर्पक शब्दात विद्यार्थ्या पर्यंत पोहचविले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य प्रसाद खानाझोडे यांनी संविधानाच्या मूळ भागाला स्पर्श करत संविधानाचे जीवनातील महत्व स्पष्ट केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उद्देश्यपत्रिकेचे वाचन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ . प्रा.निलिमा दवणे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन डॉ. विकास जुनगरी यांनी केले या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा भरगोस प्रतिसाद लाभला.