23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

संविधान दिनानिमित्त एक दिवसीय ‘संविधान जनजागृती’ कार्यशाळा संपन्न 

संविधान दिनानिमित्त एक दिवसीय ‘संविधान जनजागृती’ कार्यशाळा संपन्न 

सुरेंद्र इखारे वणी – मारेगाव येथील  कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे संविधान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये इतिहास व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘एक दिवसीय संविधान जनजागृती’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा डॉ विनोद चव्हाण हे होते . प्रमुख मार्गदर्शक लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ येथील  डॉ. कविता तातेड मॅडम या  होत्या .  यावेळी व्यसपीठावरून आपले विचार मांडत असताना म्हणाल्या  संविधानाच्या उद्देश पत्रिके नुसार भारतीय जनतेला स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यावर आधारित समाज निर्माण करण्याची हमी दिलेली आहे. त्यात स्वातंत्र्य विचार, अभिव्यक्ती स्वतंत्र, धर्म स्वातंत्र्य समान संधीची उपलब्धता, दर्जाची समानता आणि सर्वांना सामाजिक आर्थिक न्यायाची उपलब्धता यांची परिपूर्तता संविधानकर्त्यांनी राज्यकर्त्यावर टाकलेली आहे असे विद्यार्थ्यांना संबोधित केले. तसेच अध्यक्षीय भाषणातुन  बोलत असताना महाविद्यालयातील प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो असे सांगितले .  कार्यक्रमाचे  प्रास्ताविकेत इतिहास विभाग प्रमुख डॉ. गजानन सोडणर यांनी आपले संविधान केवळ भारताच्या नागरिकांना आपल्या अधिकारांनी सुरक्षित करते असे नाही, तर भारताच्या सीमेअंतर्गत समाविष्ट असणाऱ्या वन्य जीवांची तसेच वनक्षेत्रांची सुरक्षेची जबाबदारीही राज्यांवर सोपवते हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव  उद्देश आहे असे सांगितले. तसेच या व्यासपीठावरुन मनोगत  प्राध्यापक डॉ. विभा घोडखांदे , डॉ. संदीप केलोदे यांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यशाळेची सुरुवात संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करून करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मार्गदर्शक यांचा परिचय प्रा. डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी केला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी केले तर  आभार प्रा. शैलेश आत्राम यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांच्या मार्गदर्शनात  महाविद्यालयातील प्रा. डॉ. माधुरी तानुरकर, प्रा. अक्षय जेणेकर यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले .

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News