खेळ व कला संवर्धन मंडळ पं.स.वणी चे वतीनं……..
कुंड्रा येथे केंद्रीय क्रीडा महोत्सव संपन्न….
प्रशांत डी. जुमनाके / वणी
दि.३०/११/२०२२ रोजी वणी तालुक्यातील कुंड्या येथे खेळ व कला संवर्धन मंडळ पं. समिती केंद्र नेरड चे वतीने कुंड्या येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येथे केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव अंतर्गत खेळाचे आयोजन करण्यात आले आहे . तरी या कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ सोहळा आमचे लोकप्रिय आमदार मा. संजिवरेड्डी बोदकुलवार वणी विधानसभा क्षेत्र, दिनकरजी पावडे , कार्यक्रमचे अध्यक्ष विजय ठावरी सरपंच कुंद्रा, माजी सभापती सुधकराजी. गोरे, शाळा समिती अध्यक्ष गणपत गेडाम,विस्तार अधिकारी चंद्रकांत नगराडे साहेब, मुख्याध्यापक खारकर साहेब , सहायक शिक्षक अमोल जिनके, शुभम गोरे , गणपत गेडाम अध्यक्ष शा. व्य. समिती कुंद्रा , मा.श्री.गजानन विधाते, मा.श्री स्नेहल काटकर साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वणी, मा.राजेशजी खुसपुरे केंद्रप्रमुख नेरड, मा.नवनाथ देवतळे साहेब , व सर्व शाळांचे शा. व्य. समिती अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला. निलेश उरदे, अनिकेत बुच्चे, व समस्त कुंद्रा ग्रामवशी उपस्थीत होते.या उदघाटन प्रसंगी केंद्रातील 12 शाळांच्या विद्यार्थ्यांन सोबत शिक्षक सहभागी होते. यात केंद्रातील शाळांनी पाहुण्यांना शो ड्रिल चे सादरीकरण करण्यात आले.यात सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनच्या शो ड्रिल ने उपस्थित मान्यवरांचे व परिसरातील नागरिकांचे मने जिंकून घेतले.कोरोना च्या दोन वर्षानंतर विद्यार्थ्यांनचा व शिक्षकांचा उत्साह ओसंडून वाहत होता त्याचसोबत परिसरातील नागरिक यांची उपस्थिती लक्ष वेधी होती.यानंतर विद्यार्थ्यांनच्या वयक्तिक स्पर्धा पार पडल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल किनाके सर व आभार अनुराधा केळकर मॅडम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.