वणी तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालय भालरचा विजय
सुरेंद्र इखारे वणी – शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय मुले मुली कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . तालुकास्तरीय कबड्डीचे सामने वणी येथील क्रीडा संकुल येथे दिनांक 29 -11 -2022 ला 14 वर्ष आतील मुले आणि मुली चे कबड्डीचे सामने घेण्यात आले .या स्पर्धेत तालुक्यातील 16 शाळांनी भाग घेतला होता .त्या मध्ये अंतिम सामना तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालय भालर व लायन्स इंग्लिश मिडीयम विद्यालय वणी यांच्यात झाला . त्या मध्ये तुकडोजी महाराज विद्यालय भालर संघाने विजयी नोंदविला .त्यामुळे या विजयी संघाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले . यावेळी संस्थेचे सचिव श्री सुनीलभाऊ वारारकर यांनी कबड्डी संघातील सर्व मुलांचे कौतुक केले . तसेच मुख्यध्यापक श्री मनोज वारारकर , क्रीडा शिक्षक श्री लक्ष्मण ढेंगळे श्री कैलास खुजे धनराज वाघमारे सर्व शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या विजयाबद्दल कौतुक व अभिनंदन करण्यात आले या संघामध्ये कर्णधार सानिध्य जूनघरी,आयुष वारारकर ,पुष्कर वारारकर ,सुजल मेश्राम,सचिन काळे सारंग चामाटे ,यश चामाटे, मयूर लाडे ,गणेश पुरके ,चेतन द्रवे ,ओम इनामे, यांनी भाग घेतला होता.