23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्र शासनाचे विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शिक्षकांसाठी 1160 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्र शासनाचे विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शिक्षकांसाठी 1160 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

अघोषित शाळा, त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा व यापूर्वी 20 टक्के 40 टक्के अनुदान प्राप्त  शाळाना  लाभ

मा. ॲड श्री किरणराव सरनाईक यांच्या प्रयत्नाला यश

सुरेंद्र इखारे वणी – मागील पंधरा ते वीस वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अखेर आज स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्र शासनाने दिलासा दिला आहे. आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक जी केसरकर यांनी 1160 कोटी रुपयांचे पॅकेज विनाअनुदानित शिक्षकांकरिता जाहीर केले. यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच निर्गमित केले जातील.यामध्ये अनुदानास पात्र अघोषित शाळा, त्रुटी पूर्तता केलेले कर्मचारी तसेच अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहेत.
मागील दोन ते तीन महिन्यापासून शिक्षक समन्वय संघ, अघोषित शाळा समिती यांच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचे नेतृत्व इतर शिक्षक व पदवीधर आमदारांसोबत मा.श्री किरणराव सरनाईक, शिक्षक आमदार,अमरावती विभाग यांनी केले होते. श्री किरणराव सरनाईक यांनी वेळोवेळी विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्या, त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडलेल्या होत्या. तसेच सभागृहामध्ये अनेक वेळेस प्रश्न उपस्थित केले होते. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले व आज शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांनी या सर्व शिक्षकांकरिता 1160 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये अघोषित शाळेतील कर्मचारी, त्रुटीपुर्तता केलेले कर्मचारी तसेच 20% व 40% शाळेतील कर्मचाऱ्यांना वाढीव टप्पा असा लाभ मिळणार आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News