23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

वंचित बहुजन युवा आघाडीची कार्यकारनी गठीत 

वंचित बहुजन युवा आघाडीची कार्यकारनी गठीत 

तालुकाध्यक्षपदी राजू चापडे तर शहराध्यक्षपदी विशाल कांबळे यांनी नियुक्ती

प्रशांत डी.जुमनाके / वणी प्रतिनिधी 

वणी :- येथील वंचित बहुजन युवा आघाडी गठीत करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी राजेश चापडे यांची तर शहराध्यक्षपदी विशाल कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश वाणी यांचे अध्यक्षतेखाली आज ता. ३ रोजी दुपारी २ वाजता स्थानिक विश्राम गृहात एक बैठक संपन्न झाली यावेळी वणी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, जिल्हा महासचिव मिलिंद पाटील,कायदेविषयक जिल्हा सल्लागार ऍड. विप्लॉव तेलतुंबडे, तालुकाउपाध्यक्ष निशीकांत पाटील, शहराध्यक्ष किशोर मुन आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी पक्ष संघटनेकडे सर्वांनी लक्ष देऊन कार्यकरण्यासाठी मार्गदर्शन केले. व पुढील कार्यकार्णी गठीत केली. तालुका उपाध्यक्ष म्हणून मंगेश गोरे, शहर महासचिवपदीरोहित डोंगरे,सचिवपदी पवन अलोने, शहर उपाध्यक्षपदी सोनू दुर्गे , संकेत नगराळे, शहर सहसचिव चेतन रामटेके कोशाध्यक्ष शिवम खोब्रागडे, संघटक मधुर झाडे,प्रसिद्धी प्रमुख प्रेम आडकीने, आय टी सेल शहर प्रमुख आदित्य शंभरकर, तर सद्श्य अमोल दुपारे, कुणाल गेडाम, सुमेध वाळके, चेतन दुपारे , अवि खैरे, तालुका आय टी सेल प्रमुख आर्यन डोंगरे यांची निवड करण्यात आली यावेळी असंख युवक बैठकीला उपस्थित होते. यावेळी सूत्र संचलन शहरमहासचिव प्रा. डॉ. आनंद वेले यांनी केले तर आभार किशोर मुन यांनी मानले.

वणी बातमी

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News