25 C
New York
Saturday, July 13, 2024

जनसेवेसाठी अहोरात्र झटणारा युवा जनसेवक मंगेश पाचभाई…

*जनसेवेसाठी अहोरात्र झटणारा युवा जनसेवक मंगेश पाचभाई…

 *विविध हटके आदोलन करून सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यात मंगेश अग्रेसर…

प्रशांत जुमनाके /वणी प्रतिनिधी

आपल्या सामाजिक कार्याने वणी परिसरात वेगळं स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे जनसेवक मंगेशपाचभाई झरी-जामणी दुर्गम तालुक्यात अडेगाव या गावातून येणाऱ्या युवा तडफदार नेतृत्व मंगेश पाचभाई हे अनोखे आंदोलन करून न्याय मिळवून देण्यात अग्रेसर असतात तसेच अनेक सामाजिक तथा राजकीय कार्यात नेहमीच पुढे असणारे नाव म्हणजे मंगेश पाचभाई त्यांचा 6 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा होत आहे त्यांच्या जीवनपटावर टाकलेला हा प्रकाशझोत रक्तदानाच्या चळवळीपासून रुग्णांच्या नेत्र आरोग्य शिबिरे ,तपासणी शिबिरे तसेच रुग्णांना रास्ता रोको आंदोलने जे करण्याचे हटके स्टाईल स्टाईलने केलेले चिखलनायक आंदोलन, एम एस सी बी ची अंत्ययात्रा ,किंवा टाकीवर चढून शोले आंदोलन खड्ड्यात बसून रस्ता मंजुरीसाठी केलेलं अनोखा आंदोलन अशा अनेक खटके आहेत स्टाईलने आंदोलनाने मंगेश पाचभाई नेहमीच चर्चेत असतात त्यांच्या समाजकार्याने झरी- जामणी तालुका तालुक्यातील अनेक गोरगरीब रुग्णांना निराधारांना सर्वसामान्य नागरिकांना विद्यार्थ्यांना मंगेश पाचभाई याच्या माध्यमातून न्याय मिळत चाललेला आहे

कोरोना सारख्या काळात आपल्या स्वतःच्या गाडीतून रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाणे स्वतःच्या जीवाची परवाना न करता रुग्णसेवेसाठी अहोरात्र रुग्ण सेवा करत असतात सोबतच गावात कोरोना काळात स्वखर्चातून निर्जंतुकीकरण हॅन्ड वॉश केंद्र मुकुटबन सारखे आरोग्य केंद्रात ऑक्सिजन कॉन्स्टंट सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देणे असो की एखाद्या रुग्णाला रक्त लागत असल्यास मंगेश चे नाव आपसूक तोंडी येते आजपर्यंत हजारो रुग्णांना रक्तदानाच्या जाळ्यातून जीवनदान देण्याचे कार्य मंगेश पाचभाई वयाच्या सोळाव्या वर्षापासून जनसेवेत साठी झोकून दिले आहेे. रक्तदानाची स्वतःची संस्था उभारून दहा हजार लोकांना रक्त पुरवठा केला आहे केलेला आहे ते स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून हजारो रुग्णांना आताही रक्तपुरवठा करत असतात आणि जीव वाचवत असतात झरी- जामनी दुर्गम तालुका असलेल्या एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मंगेश हे उच्चशिक्षित असून समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागतं या माध्यमातून समाजाची दिन दुबळ्या गरिबांची निराधारांची सेवा करताना अनेकदा आपण वृत्तपत्रात वाचतो अशा या तरुण कार्यकर्त्याला आजपर्यंत समाज भूषण गुरुदेव भूषण बच्चू कडू यांच्या माध्यमातून आरोग्य सेवक असे अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहे राजकारांतही आपली वेगळी छाप त्या युवा नेत्यांनी अडेगाव ग्रामपचायत, अडेगाव ग्राम विकास सोसायटी वर आपलं एक हाती वर्चस्व स्थापन करून आपल्यातील राजकारणी गुण दाखवून दिला आहे दिग्गजांना चित करून आपला झेंडा रोवला आहे तरी या युवा जनसेवकाला युवा नेत्याला पुढील वाटचाली करता अनंत शुभेच्छा तसेच वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

वणी बातमी

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News