23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

नागपूर हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची सुधीर मुनगंटीवार यांची मागणी*

*नागपूर हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची सुधीर मुनगंटीवार यांची मागणी*

*केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना लिहीले पत्र*

जयंत साठे नागपूर प्रतिनिधी – ( दि. 7 डिसेंबर 2022)
विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैद्राबादशी जवळचा व्यापारी संबंध असल्याने नागपूर हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस लवकरात सुरू करावी अशी मागणी राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर आणि गोंदियाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्र लिहून केली आहे.
नागपूर हे मध्य भारतातील मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या प्रांताना जवळचे सगळ्यात मोठे शहर आहे. तसेच ते एक औद्योगिक शहर म्हणून नावारूपास येत आहे. हैद्राबाद हे दक्षिणेकडील या भागातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र आणि औद्योगिक शहर आहे. नागपूर ते हैद्राबाद जोडणार्‍या सध्या 22 रेल्वे गाड्या असल्या तरी 575 कि.मि. चे हे अंतर पार करणारी वेगवान गाडी असणे आवश्यक आहे. नागपूर सोबतच भंडारा, गोंदीया, चंद्रपूर या जिल्ह्यांनाही या वंदे भारत एक्सप्रेसचा फायदा होईल, असे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. या रेल्वेमुळे पर्यटक, व्यापारी आणि उद्योजक यांच्या सोयी करता नागपूर हैद्राबाद जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News