Sunday, October 6, 2024
Google search engine
HomeUncategorized१७ निराधारांची निवड करून डॉ. आंबेडकरांना आगळी वेगळी श्रद्धांजली

१७ निराधारांची निवड करून डॉ. आंबेडकरांना आगळी वेगळी श्रद्धांजली

१७ निराधारांची निवड करून डॉ. आंबेडकरांना आगळी वेगळी श्रद्धांजली

श्रीगुरुदेव सेना व वंचितचे दिलीप भोयर यांचा स्तुत उपक्रम

प्रशांत जुमनाके वणी :- विश्वरतन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून निवली येथे वंचित निराधार लोक कल्याण अभियानांतर्गत वंचित निराधार लाभार्थी निवड व व्यसनमुक्ती शिबीर घेऊन १७ निराधारांची निवड करून महामानव डॉ आंबेडकरांना आगळी वेगळी श्रद्धांजली दिलीप भोयर यांचे कडून अर्पण करण्यात आली.

श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा अध्यक्ष व निर्मिती बहुद्देशीय संस्थाचे अध्यक्ष दिलीप भोयर यांनी ता. ६ डिसेंम्बर २०२२ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिना पासून तर ता. ३० एप्रिल २०२३ पर्यंत गाव तेथे निराधार लाभार्थी निवड व व्यसनमुक्ती शिबाराचा लोककल्याणकारी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची सुरवात निवली येथून सुरू करण्यात आला आहे. ता. ६ डिसेंबर रोजी निवली येथील ग्राम पंचायत कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच बबनराव वाटेकर, मार्गदर्शक म्हणून दिलीप भोयर तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच पवन खिरडकार,ग्राम पंचयत सदस्य अनिल खाडे, सौ.मेघाताई गोवरदीपे, सौ. मनीषाताई मोहितकर, सौ. रुपालिताई काकडे, सौ. प्रतीक्षाताई मोहितकर, पोलीस पाटील किशोर ताजने, सोसायटी अध्यक्ष मंगल बलकी, तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश ताजने (राजू) , माजी सरपंच केशवजी उलमाले,शाळा सुधार समितीचे अध्यक्ष रामकीसन ताजने, सामाजिक कार्यकर्ते रामदास पखाले आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात निराधार वयोवृद्ध, विधवा माता बघिणी, व दिव्यांग अश्या १७ निराधांची निवड करण्यात आली व त्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. अश्या गोरगरिबांची सेवा म्हणजेच खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आपली श्रद्धांजली आहे असे मत दिलीप भोयर यांनी व्यक्त केले. तसेच ग्राम पंचायतीचे कामकाज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित राष्ट्रवंदना घेऊन सुरू करावे असे निवेदन ग्रामसेवक अनिल टेमुर्ने यांचेकडे देण्यात आले व राष्ट्रवंदना घेऊन शिबिराचे सांगता करण्यात आली शिबिर यशस्वी करण्यासाठी सुभाष परचाके, वैभव मेश्राम, प्रतिमा मडावी, नंदू ढुमणे, महेश ताजने, होमदेव काकडे आदींनी परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments