हत्तीच्या कळपाने धानाचे नुकसान
शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
फुटबॉलसारखी उडविली दुचाकी
जयंत साठे, नागपूर प्रतिनिधी:– जंगली हत्तींना पाहण्यासाठी गेलेल्या युवकाची दुचाकी फुटबॉल सारखी उडवून लावल्याची घटना लाखांदूर तालुक्यात घडली. लाखांदूर तालुक्यातील ग्रामीण भागात जंगली हत्तीच्या कळपाणे एका युवकाच्या दुचाकीचे नुकसान केले. जंगली हत्तीने लाखांदूर तालुक्यात प्रवेश करून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या हत्तींना पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली असून वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.