कोळशाची वाहतूक मुळे नागरिक त्रस्त….
कोळसा वाहतूकदार उठले मानवाच्या जीवावर..
प्रशांत जुमनाके / वणी
वणी हे शहर ब्लॅक डायमंड सिटी या नावाने ओळखले जातात . या वणी परिसर लगत अनेक कोळसा खाणी आहेत . या कोळशाच्या धुरीमुळे जनता आधीच परेशान आहेत. राजूर ते चिखलगाव रस्ता पार करायचा म्हटले की नाक दाबून जावे लागते अशी अवस्था असताना त्यात वणी तालुक्यातील लालपुलीया येथे अनेक खाजगी कंपन्या असून चिखलगाव ते राजूर चे मध्य रस्त्यावर अनेक कोळसा सायडिंग थाटून अनेक व्यापारी हे कोळसा विक्रीचा व्यवसाय करत आहेत. आणि या सायडिंग वरून मोठ्या प्रमाणात कोळसा व्यापाऱ्याला पाठवल्या जाते. सदर कोळशाचे व्यापारी हायवा भरून कोळसा हायवे रस्त्याने वाहतूक करीत असताना किंवा एका ठिकाणी वरून दुसरीकडे पाठवताना निष्काळजीपणे त्या कोळशाचे वाहन भरून नेनाऱ्या गाडीला कुठलिही ताडपतरी न बांधता कोळसा वाहतूक केल्या जात आहे . त्यामुळे कोळश्याचे कण हे हवेच्या माध्यमातून दुचाकी वाहन चालकाच्या डोळ्यात जात असल्याने अपघाताला आमंत्रण देत आहेत. हे वाहन बिनधास्त चालते . यामुळे सकाळचे सुमारास रस्त्याने जाणारे शाळकरी मुले, कामगार, शिक्षकेत्तर कर्मचारी किंवा मजूर वर्ग यांना कोळशाचे भरधाव धावणारे बिना ताडपत्री नसलेल्या वाहनाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. तरी याकडे वाहन परिवहन विभागाने लक्ष द्यावे. असे जनतेतून बोलल्या जात आहेत.