23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

पर्यावरणास हानिकारक असणारे प्रोसिफिस वनस्पती नष्ट करा   

पर्यावरणास हानिकारक असणारे प्रोसिफिस वनस्पती नष्ट करा     

  एसडीओन दिले निवेदन   

सुरेंद्र इखारे वणी –       पर्यावरणास हानिकारक असणाऱ्या प्रोसेपीस झुडपे नष्ट करण्याबाबतचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार निखिल धुळधर याना दिले आहे.       वेकोलीने मातीचे ढिगारे तयार करून त्या ढिगाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या ढिगाऱ्यावर बारमाही प्रोसेपीस झुडपे वाढून जंगल परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे या जंगलात वन्यप्रान्याचा समावेश आहे यामध्ये वाघ,रोही,जंगली डुक्कर यांचे वास्तव्य वाढल्याने या जंगली प्राण्यामुळे वेकोली लागत असणाऱ्या गावांतील शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस होत असल्याने मोठे नुकसान होत आहे तसेच  वाघाचा  वावर मोठ्या प्रमाणात असल्याने वाघाने मनुष्यावर हमला करून ठार केले आहे त्यामुळे परिसरात वाघाच्या दहशतीचे वातावरण आहे.याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रोसिफिस ही विदेशी वनस्पती पर्यावरणाच्या दृष्टीने फायद्याची नसून उलट दाट झुडपी तयार होत आहे तसेच ही वनस्पती जमिनीतील पाणी शोषून घेते त्यामुळे जलस्रोत कोरडे पडून जमीन बंजर होण्याच्या मार्गावर आहे.  यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याना तक्रार केली त्यानुसार पर्यावरण मंत्रालय भारत सरकार प्रदूषण बोर्ड निरी यांच्या पर्यावरण मंजुरीमध्ये हरिद् पट्टा निर्मितीसाठी देशी झाडांचे उल्लंघन केले आहे तसेच मानवजातीला घातक असणारे प्रोसिफिस वनस्पती सर्वत्र आढळत असल्याने पाणी स्त्रोत शेती,चराई क्षेत्र, रस्ते सुरक्षित क्रवायकरिता संबधीत विभागाने बैठक लावून ही वनस्पती उपटून नष्ट करून तालुक्यातील पर्यावरणाची हानी थांबवावी अशी मागणी केली आहे संबधीत निवेदनाच्या प्रति आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार व जिल्हाधिकारी अमोल येडगे याना पाठविण्यात आले आहे. यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर, व समस्त गावकरी होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News