वणीत निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबा स्मृतिदिन निमित्ताने अभिवादन.
प्रशांत जुमनाके वणी – जगाला किर्तनातून स्वच्छतेचा व निर्व्यसनी जीवन जगण्याच्या संदेश देणारे श्री संत गाडगेबाबा यांचा ६६ वा स्मृतिदिन विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले.
निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबांच्या स्मृतिदिनी पहाटे वणी शहरातील गाडगेबाबा चौकात नामदेवराव शेलवडे यांच्या उपस्तितीत पहाटेच्या रामधून सहित अभिवादन सहित व निळापूर रोडवरिल परिसरात स्वच्छता अभियान राबाविण्यात आले. त्यानंतर सकाळी दहा वाजता शहरातील ग्रामीण रुग्णालयात डॉ. भालचंद्र आवारी अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वणी, गाडगेबाबा यांच्या विचाराचे प्रचारक गुणवंत पचारे गुरुजी यांचे उपस्तितीत रुग्णांना फळे व बिस्कीट चे वाटप करण्यात आले. त्यानंतर श्री संत गाडगे बाबा स्मारक स्थळी बाबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी राजू तुराणकर, प्रदीप मुके, दिपलाल चौधरी, राजेंद्र क्षीरसागर, संजय चिंचोलकर, प्रवीण वाघमारे, श्याम बिहारीं, ज्ञानेश्वर भोंगळे, बबन चिंचोलकर, अरविंद क्षीरसागर, विनोद वाघमारे, श्रीमती कलावती क्षीरसागर, जनार्दन थेटे यांच्या उपस्तितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी सदर कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष कैलास बोबडे, उमाकांत भोजेकर, बाळू तुराणकर, भास्कर पत्रकार, प्रशांत महाकुलकर, स्वप्नील बिहारीं, पवन बोबडे, सतीश दोडके, अनील खीरकर, राजू क्षीरसागर,विनोद चिंचोलकर, नरेंद्र क्षीरसागर, कवडू दुरुटकर,विनोद चिंचोलकर, प्रशांत पत्रकार, योगेश बोबडे, यांनी परिश्रम घेतले तर सदर कार्यक्रमाला रमा क्षीरसागर, गीता तुराणकर, शोभा महाकुलकर, प्रतिभा फाले, उज्वला बोबडे, मीना तुराणकर संगीता चिडे, व असंख्य महिला समाज बांधव व संतप्रेमी बांधव उपस्थित होते.