वणी शहरातील रस्त्यांवरचे पथदिवे बंद अवस्थेत
नगर परिषदचे याकडे पुर्णतः दुर्लक्ष….
प्रशांत जुमनाके वणी- नगरपरिषद हद्दीतील असलेले गुरुनगर ते साने गुरुजी नगर चौक पर्यंतचा रस्ता या रत्यावर नगरपरिषद चे वतीने लाईन खांब रस्त्याच्या कडेला असून सदर अंदाजे चार ते पाच खांबाचे अंदाज एक महिन्या पासून विद्युत बल्ब बंद अवस्थेत आहेत. सदर त्या रस्त्याचे बाजूला अनेक गोरगरीब लोकांची घरे असून लहान मुले ही अंधारात सायंकाळी खेळत असतात. परंतु तेथे बल्ब बंद असल्याने सर्वत्र अंधार पसरलेला असतो एखादा व्यक्ती रात्रीच्या सुमारास जायचे असल्यास त्यांना या अंधाराचा सामना करावा लागत आहेत. परंतु याकडे नगरपरिषद अधिकारी ही बघ्याची भूमिका घेत असतात. त्यामुळे सामान्य जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. तरी याकडे नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी यांनी या बाबीकडे लक्ष देऊन तत्काळ पथदिवे चालू करावे .असे जनतेतून बोलल्या जात आहेत.